आवाज कोकणचा / कुडाळ

प्रतिनिधी - ७ मार्च २३

महिला उत्कर्ष समिती कुडाळच्या वतीने महिला दिन उत्साहात संपन्न...





पत्रकार उत्कर्ष समिती अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समिती कुडाळ तालुका अध्यक्ष तन्वी सावंत, उपाध्यक्ष सुस्मीता राणे , सचिव नेहा परब , सदस्य दीपा चव्हाण , रूपाली वरक , दीप्ती चव्हाण यांनी हा कार्यक्रम आयोजीत केला होता.


आपल्या हक्कासाठी लढलेल्या महिलांना त्यांचे अधिकार प्राप्त झाल्याच्या स्मृती प्रित्यर्थ ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो .



या दिनाचे औचित्य साधत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .


कोकण विभाग अध्यक्ष सौ. ज्योतीका हरयाण , सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष सौ. दीपा ताटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात रक्तदान शिबिराने करण्यात आली.



 त्यानंतर होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा जल्लोषमय कार्यक्रम साजरा झाला .

 कोकण विभाग हा जंगल व हिरवाईने नटलेला प्रदेश आहे . तसेच या विभागांमध्ये वर्षभर रानभाज्या उपलब्ध असतात या भाज्या शरीर स्वास्थ्याला फायदेशीर ठरत असल्याने त्याची महती जनमानसात पोचावी व त्या खाण्याकडे सामान्यांचा कल वाढावा यासाठी या रानभाज्यांची पाककला स्पर्धा भरवण्यात आली होती. वेगवेगळ्या प्रकारच्या पाककृती सादर करून उपस्थितांनी त्याचा आनंद घेतला. 








Comments

Popular posts from this blog