आवाज कोकणचा / मुंबई
प्रतिनिधी दि . २१ मार्च २४
चतुरस्त्र अभिनेत्री सिद्धी कामथ यांची काँग्रेस सांस्कृतिक सेलच्या प्रदेश कार्यकारी प्रमुख पदी निवड...
चित्रसृष्टीतील आघाडीची नायिका चतुरस्र अभिनेत्री सौ. सिद्धी कामथ यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार प्रमोद मोरे यांनी काँग्रेस पक्ष सांस्कृतिक सेलच्या महाराष्ट्र कार्यकारी प्रमुख पदी निवड जाहीर केली आहे.
सौ सिद्धी कामथ या चित्रपटसृष्टीसह सामाजिक क्षेत्रात तसेच महिलांच्या हितासाठी नेहमीच हिरीरीने काम करत असतात. त्यांच्या या सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील कामाची दखल घेऊन हि निवड करण्यात आली आहे.
सौ सिद्धी कामत यांच्या या निवडीबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्ष होत आहे .
पत्रकार उत्कर्ष समिती अध्यक्ष डॉ अशोक म्हात्रे व महिला उत्कर्ष समिती अध्यक्ष डॉ स्मिता पाटील यांनी त्यांच्या या निवडीबद्दल अभिनंदन केले आहे तसेच पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
Comments
Post a Comment