उरण येथील उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या शिवसेनेत प्रवेश
उरण येथील उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश
मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या पक्षात केले स्वागत.....
प्रतिनिधी पूजा चव्हाण
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील उरण येथील उबाटा गटाच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथे येऊन शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे स्वागत करून त्यांच्या भावी वाटचालीच्या शुभेच्छा यावेळी दिल्या. उद्धव ठाकरे यांच्या मावळ लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्या आधीच पक्षातील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेची वाट ठरल्यामुळे हा मोठा धक्का जणू लागल्याचे समजले जात आहे. आज आपल्या दौऱ्याची सुरुवात उरण येथून करण्यापूर्वीच उरण मधील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेची वाट धरली आहे. यात उबाटा पंचायत समिती सदस्य युवासेना तालुका प्रमुख दीपक ठाकूर, माजी सभापती चंद्रकांत पाटील, उबाठा गटाचे उलवे शहर प्रमुख, शाखा प्रमुख यांचा शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के साहेब, युवासेना राष्ट्रीय सचिव रूपेश पाटील व उरण विधानसभा पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
Comments
Post a Comment