जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत पत्रकार उत्कर्ष समितीने केला सन्मान  ती च्या कर्तुत्वाचा...


पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला उत्कर्ष समिती अध्यक्ष डॉ.  स्मिता पाटील,  



पत्रकार उत्कर्ष समिती खजिनदार व दिल्ली येथे पार पडलेल्या खेलो इंडिया स्पर्धेमध्ये उल्लेखनीय सहभाग नोंदवनाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रशिक्षक शैलेश ठाकूर, सहसचिव ज्ञानेश्वर कोळी यांनी महाशिवरात्री आणि जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत



 खेलो इंडिया या देशपातळीवरील कराटे खेळामध्ये ब्राँझ , सिल्व्हर, गोल्ड यासारखी पदके मिळवलेल्या 21 कुमारी खेळाडू, तसेच ग्रामीण भागातून वैद्यकीय क्षेत्रात उच्च शिक्षण घेउन देशाच्या जडणघडणीत सहभाग नोंदवणाऱ्या प्रतीक्षा कोळी , वेदिका कोळी , हवाई क्षेत्रात उंच भरारी घेत हवाई सुंदरी बनलेल्या स्नेहा भगत या युवतींना सन्मानित करण्यात आले.



 अग्रोली नवी मुंबई येथील शिव मंदिराजवळ आयोजित एका कार्यक्रमात अग्रोली येथील दानशूर ज्येष्ठ समाजसेवक श्री. गजानन पाटील, महिला उत्कर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्ष डॉ स्मिता पाटील यांच्या हस्ते या सर्वांना सन्मानित करण्यात आले.



Comments

Popular posts from this blog