श्रीकृपा सोसायटीमध्ये महिला दिन उत्साहात साजरा.....
श्री कृपा सोसायटीमध्ये महिला दिन उत्साहात साजरा.....
पनवेल/आवाज कोकणचा,
जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून श्रीकृपा सोसायटीतील महिलांनी एकत्र येऊन महिला दिन साजरा केला....
श्री कृपा सोसायटी महिला सदस्यांनी महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्यादरम्यान वेगवेगळे खेळ खेळण्यात आले .जेणेकरून महिला एकत्र येऊन त्यांचा रोजच्या जीवनात होणारा मानसिक त्रास कमी व्हावा या दृष्टिकोनातून महिला दिन साजरा करण्याचे ठरवण्यात आले होते.यात प्रामुख्याने महिला उत्कर्ष समितीच्या उपाध्यक्ष आरती पाटील व सोसायटीच्या सदस्य अर्चना देवकर यांचा अनमोल सहभाग होता. यांनी महिला दिन का साजरा करावा या संदर्भात थोडक्यात माहिती उपस्थित महिलांना दिली व आपण असेच एकत्र राहिलो तर आपली ताकद वाढेल व आपल्यासमोर येणारे कोणतेही काम आपण निर्भयपणे करू शकतो . असेच आपण एकत्र आलो तर प्रत्येक महिला मधला दुरावा दूर जाऊ शकतो. तसेच या कार्यक्रमाचे नियोजन अक्षता पालकर विधी केळकर यांनी नियोजन फार उत्तम केले. या दिनाचा औचित्य साधून सोसायटीतील सर्व महिला सहभागी झाल्या .जागतिक महिला दिन चा केक कापून साजरा करण्यात आला तसेच सर्व महिलांना सोसायटीतील त्यांच्या नवऱ्याने गिफ्ट देऊन नवीन सुरुवात केली. महिला दिन उत्साहात साजरा करण्यामध्ये सोसायटीच्या महिला सदस्य साक्षी लोवरे ,जानवी शिंदे, दीपिका म्हात्रे, सुनिता सातमकर कविता पाटील, सुवर्णा पाटील ,गौरी जेमसे, जेमसे मावशी, हर्षा पवार ,वैदही मोरे. यांचा सहभाग होता.
Comments
Post a Comment