आवाज कोकणचा / नवी मुंबई

उरण/पुजा चव्हाण

शुल्लक वादावरून एकाचा खून ! चार  संशयीत पोलिसांच्या ताब्यात



        या घटने मधील फिर्यादी शाहरुक हुसेन खान वय वर्ष 20 रहाणार संघर्ष नगर झोपडपट्टी मोरारोड भवरा ता.उरण,जि. रायगड व त्याचा मित्र मयत रौफ अकबर खान व आन्य एक मित्र हे जेएनपीटी परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या असणार्‍या कंटेनर ट्रेलर मधून चोरी करण्याच्या उद्देशाने आलेया परिसरात आले असता रस्त्याच्या कडेला पार्क करून ठेलेल्या ट्रेलर चालका सोबत झालेल्या वादवदीचे रूपांतर हाणामारीत झाल्याने या भानगडीत रौफ अकबर खान याला जीव गविण्यची वेळ आली. झालेल्या मारहाणीत लथबुक्याने जबर मारहाण केल्याने व ट्रेलर चालकाने डोक्यावर लकडी दांडा मारल्याने गंभीर स्वरूपी जखमी झालेल्या रौफ अकबर खान याचा उपचार दरम्यान मुंबई येथील सायन रुग्णालयात मृत्यू झाला.या घटने मुळे जेएनपीटी परीसरांतील ट्रेलर चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.



      या घटने बाबत पोलिस सूत्रांकडून देण्यात आलेल्या महितीनुसार शाहरुक हुसेन खान, रौफ अकबर खान व त्यांचा एक मित्र जेएनपीटी परिसरात उभ्या असणार्‍या कंटेनर ट्रेलर मधून चोरी करण्याच्या उद्देशाने आले होते.परिसरांतील चांदणी चौकांतील सर्व्हिस रोड मध्ये उभ्या असलेल्या कंटेनर ट्रेलर क्रं.एमएच 43 यु 2436 यावरील चालका बरोबर या घटनेतील फिर्यादी शाहरुक हुसेन खान याचा वाद झाला असता शाहारुने सदर ट्रेलरच्या ड्रायव्हर बाजूकडील काच दगड मारून फोडली असता चिडलेल्या ट्रेलरच्या चालकांने इतर साथीदार चालकाना बोलाऊन फिर्यादी शाहरुक व त्याचे दोन पळून जात असलेले साथीदारांचा पाठलाग करून त्यांना यांना पकडून पांच ते सहा ट्रेलर चालकांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली दरम्यान सदरच्या ट्रेलर चालकाने हातांतील लकडी दांड्याने रौफ अकबर खान यांच्या डोक्यावर मारून जबर दुखापत केल्याने त्याला प्रथम उरण येथे हॉस्पिटल व नंतर अधिक उपचारासाठी मुंबई येथील सायन रुग्णालयात दाखल केले असता उपचार दरम्यान रौफ खान याचा 06/04/2024 रोजी दुपारी 13:50 च्या दरम्यान मृत्यू झाला.



     मात्र रौफ खान यास सायनरुग्णा लयात दाखल करते वेळी तो सायकलवरुन पडून जखमी झाल्याचे ससांगीतले होते. मात्र त्याच्या मृत्यू नंतर फिर्यादीने खरी परिस्थिति सांगितली असता सायन पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद आकस्मित मृत्यू अशी करण्यात येऊन पुढील तपसाकरिता या घटनेची कागदपत्रे न्हावा-शेवा पोलिसठाण्यात पाठविण्यात आली.त्यानंतर प्रत्यक्ष साक्षीदारव तक्रारदार यांचा जबाब नोंद करून भा.द.वी.कलम 302, 324, 143, 144, 147, 149, 323,504 प्रमाणे गुन्हा र.न. 56/2024 अन्वये न्हावा-शेवा पोलिसठाण्यात नोंदविण्यात आला आहे, या गुन्ह्यातील चार संशयीत आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

      या घटने संदर्भात पारीमंडळं-2 पनवेलचे पोलिस उप आयुक्त विवेक पानसरे,पोर्टविभागाचे सहा.पोलिस आयुक्त डॉ.विशाल नेहुल, न्हावा-शेवा पोलिसठाण्याचे व.पो.नि.राजेंद्र कोते, सहा.पो.नि.अमोल शिंदे,सहा.पो.नि.संजय मोहिते,पोलिस उप निरीक्षक नितिन सांगळे.यांनी सदर घटने नंतर दि.9/04/2024 रोजी घटना स्थळी भेट दिली आहे.वरील सर्व पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली न्हावा-शेवा पोलिसठाण्याचे व.पो.नि.राजेंद्र कोते हे अधिक तपास करीत आहेत.

Comments

Popular posts from this blog