आवाज कोकणचा / नवी मुंबई
प्रतिनिधि
पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र पदाधिकारी निवड जाहीर...
श्रीमती बारकुबाई पाटील विद्यालय रोडपाली पनवेल येथे
पत्रकार उत्कर्ष समितीच्या सदस्यांची सभा संपन्न झाली .
अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव डॉ. वैभव पाटील, खजिनदार शैलेश ठाकूर यांच्यासह उपस्थीत सर्वांच्या सहमतीने विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी अस्तित्वात असलेल्या जुन्या सर्व कमिटी बरखास्त करण्यात आल्या तसेच ज्यांच्या ओळखपत्राची मुदत संपलेली असुन हि कार्डचा वापर करत असेल तर तो गुन्हा आहे त्या संदर्भात नवी मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र देण्यात येणार आहे
.
यावेळी पत्रकार उत्कर्ष समितीची भविष्यातील कार्यप्रणाली वर्षा सहल, विद्यार्थी सन्मान सोहळा, पदाधिकारी निवड, ओळखपत्राचे नूतनीकरण याबद्दल विस्तृत चर्चा करण्यात आली .पत्रकारिता करत असताना ज्या समाजात आपण रहातो त्या समाजाबरोबर आपल्या सामाजिक जबाबदारीचे भान लक्षात ठेऊन अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. जिथे अन्याय होतो तिथे मदतीसाठी आवाज उठविण्याचे कार्य पत्रकार उत्कर्ष समिती आवर्जून करीत असते.
यावेळी अध्यक्ष डॉ अशोक म्हात्रे यांनी सर्वांच्या उपस्थित पदाधिकारी निवड जाहीर करण्यात आल्या. श्री राम जाधव यांची महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी , श्री. ज्ञानेश्वर कोळी महाराष्ट्र राज्य सहसचिव , श्री. गणेश कांबळे यांची पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली .
तसेच डॉन के के महाराष्ट्र संघटक, श्री. प्रकाश गायकवाड महाराष्ट्र मार्गदर्शक , श्री. अलंकार भोईर कोकण विभागीय संघटक, श्री. गुरुनाथ तिरपणकर कोकण विभाग सह संघटक, श्री. गोविंद जोशी कोकण विभागीय अध्यक्ष, श्री. लालचंद यादव कोकण विभागीय कार्याध्यक्ष ,
श्री. एकनाथ सांगळे कोकण विभागीय सचिव , श्री. राजेंद्र लंकेश्री मुंबई अध्यक्ष , श्री. निलेश उपाध्याय नवी मुंबई अध्यक्ष , श्री. मार्कंडेय केवट सदस्य नवी मुंबई,
श्री. सोनी, अवधेश उपाध्याय नवी मुंबई सदस्य , श्री. सुनील भोईर रायगड जिल्हाध्यक्ष, श्री . मिलिंद खार पाटील रायगड जिल्हा उपाध्यक्ष , श्री. राजेंद्र होळकर जिल्हा सदस्य, श्री. अशोक घरत पनवेल तालुका अध्यक्ष, श्री. विश्वनाथ गायकवाड पनवेल सचिव, श्री. नरेंद्र देशमुख, आदित्य वाघ पनवेल सदस्य, अशा प्रकारे नियुक्ती करून नियुक्ती पत्र देण्यात आली.
तसेच यावेळी 376 वेळा 278 किलो वजनाची मोटार सायकल पोटावरून नेऊन जागतिक विश्व विक्रम करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नावाची नोंद झालेल्या श्री. पंडित धायगुडे यांचा पत्रकार उत्कर्ष समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला.
Comments
Post a Comment