आवाज कोकणचा / नवी मुंबई
कामगार नेत्या श्रुती म्हात्रेनी कुटुंबासमवेत बजावला मतदानाचा हक्क
आई, बहिणीसोबत जासई बेलपाडा येथील मतदान केंद्रावर बजावला हक्क
( उरण प्रतिनिधी पूजा चव्हाण यांच्याकडून .)
33 मावळ लोकसभा मतदार संघातील निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली असून कॉग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा श्रुती श्याम म्हात्रे यांनी उरण तालुक्यातील जासई बेलपाडा येथे आपल्या कुटुंबासोबत मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या मातोश्री रीना श्याम म्हात्रे आणि बहीण श्रेया श्याम म्हात्रे यांनी आपले बहुमूल्य मतदान करीत देशातील मतदारांना मतदान करण्याचा संदेश दिला आहे.
लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे लोकसभेची निवडणूक. हा उत्सव महाराष्ट्रासह देशभरात सुरु आहे. लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा आज महाराष्ट्रासह देशभरात पार पडतो आहे. आज महाराष्ट्रात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, अहमदनगर, शिर्डी, बीड आणि मावळ या ठिकाणी मतदान पार पडत आहे. मावळमध्ये शिवसेना शिंदे गटाचे श्रीरंग बारणे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजोग वाघेरे पाटील या दिग्गजांचं भवितव्य आज मतपेटीत बंद होत आहे. १ जून पर्यंत देशात लोकसभा निवडणुकीचे टप्पे पार पडणार आहेत. तसंच ४ जूनच्या दिवशी निकाल असणार आहे. त्यामुळे आज कसं आणि किती टक्के मतदान होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. तीन टप्पे राज्यासह देशभरात पार पडले आहेत. मात्र असे असले तरी मावळ लोकसभेसाठी कोण आघाडीवर जाईल हे जनता ठरवित असली तरी महाविकास आघाडीच्या माध्यमातून जोरदार प्रचार करून बारणे यांच्या अडचणी वाढविल्या आहेत. आज पनवेल आणि उरण परिसरात झालेल्या मतदानामध्ये महाविकास आघाडीच्या बाजूने मतदारांचा कौल पाहायला मिळाला असल्याचे मत काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा तथा कामगार नेत्या श्रुती श्याम म्हात्रे यांनी मतदानानंतर प्रतिक्रिया देताना सांगितले.
Comments
Post a Comment