आवाज कोकणचा / उरण

चिरनेर येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात संपन्न.


छावा प्रतिष्ठान चिरनेर, युद्धनौका ग्रुप, ग्रामस्थ मंडळ चिरनेर यांच्या संयुक्त विद्यमाने उरण तालुक्यातील चिरनेर कातळपाडा येथे श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. संपूर्ण रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्या मोठ्या उत्साहात साजरी केली जाणारी श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती हि एकमेव आहे .यंदा जयंतीचे हे 10 वे वर्ष आसल्याची माहीती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अॅड सुभाष कडू यांनी दिली.


सकाळी 9 वा. श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, सकाळी 10 वा. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्मोत्सव,12 वाजता सत्यनारायणाची पूजा करण्यात आली.त्यानंतर सायंकाळी 5 वाजता छत्रपती संभाजी महाराजांची पालखी शिव प्रेमी, समस्त शिवभक्त, ग्रामस्थ मंडळ चिरनेर उरण, भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली.यावेळी महिलांनी नववारी तर पुरूषांनी कूर्ता पायजमा व डोक्यावर फेटा असा पारंपारीक साज केला होता.तर स्थानीक महिला मूलींनी लेझीम वर ताल पकडला होता.पुष्प वृष्टी व टाळ मृदूंग व घोषणा देत पालखी काढण्यात आली होती.



या कार्यक्रमाला काँग्रेस रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, बोरखारचे उद्योजक तेजस डाकी,राष्ट्रवादी काँग्रेसचे उरण विधानसभा आध्यक्ष वैजनाथ ठाकूर, जिल्हा परिषद सदस्या कुंदा ठाकूर,चिरनेरचे सरपंच भास्कर मोकल,उद्योजक माणिक म्हात्रे,तंटामुक्ती अध्यक्ष अलंकार परदेशी, पंचायत समितीच्या माजी उपसभापती शुभांगी पाटील,उद्योजक गोरख ठाकूर,आजी माजी ग्रामपंचायत सदस्य व परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.सर्वांचे संस्थेचे पदाधीकारी भारतीय तोफखान्यातील निवृत्त सैनिक सचिन कडू यांनी स्वागत केले


यावेळी सर्व शिवभक्तांनी पालखी सोहळ्यास उपस्थित राहून छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना दिली.व दिवसभरातील विविध धार्मिक कार्यक्रमांचा लाभ शिवभक्तांनी घेतला. कार्यक्रमाचे उत्तम आयोजन, नियोजन केल्याने शिवभक्तांनी, विविध सामाजिक संघटनानी सदर उपक्रमांचे, नियोजनाचे कौतुक केले.

छावा प्रतिष्ठानच्या सर्व पदाधीकारी ,सदस्य व ग्रामस्थ चिरनेर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.



Comments

Popular posts from this blog