आवाज कोकणचा / नवी मुंबई
उलवे / प्रतिनिधि
पत्रकार उत्कर्ष समिती व महिला उत्कर्ष समिती तर्फे मोफत गर्भाशय मुखाचा कॅन्सर तपासणी शिबिर गव्हाण येथे संपन्न....*
पत्रकार उत्कर्ष समिती या राज्यस्तरीय पत्रकार संघटना व अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समिती यांनी संयुक्तपणे मोफत रित्या आयोजित केलेल्या गर्भाशय मुखाचा कॅन्सर या रोगाविषयी जनमानसात माहिती व्हावी यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .
पत्रकार उत्कर्ष समिती अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांनी उपस्थित महिला भगिनींना रोगाविषयी प्राथमिक माहिती दिली.
महिला उत्कर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. स्मिता पाटील यांनी गर्भाशय मुखाचा कॅन्सर या आजाराविषयी सांगताना या रोगाची कारणे, लक्षणे व काळजी याविषयीं अधिक माहिती दिली. मॅग्नस हॉस्पिटल उलवे च्या संचालिका प्रमुख स्री रोगतज्ञ डॉ. अश्विनी देशमुख यांनी उपस्थित रुग्णांची तपासणी केली तसेच त्यांचे मानसिक प्रबोधन केले .
यावेळी Pap smear, HPV DNA testing, HbsAg, and HBV DNA testing या चाचण्या मोफत करण्यात आल्या असून भविष्यात अशा आजाराची काही लक्षणे आढळल्यास त्यावरील उपचार याबाबत पत्रकार उत्कर्ष समिती सहकार्य करणार असल्याचे अध्यक्ष डॉ . अशोक म्हात्रे यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी गव्हाण ग्रामपंचायतचे ग्राम विकास अधिकारी श्री राठोड, सरपंच सौ माई भोईर , सदस्य सौ उषा देशमुख , सदस्य सौ. कामिनी कोळी यांचे मोलाचे सहकार्य लाभले .
या कार्यक्रमासाठी पत्रकार उत्कर्ष समितीचे सचिव डॉ. वैभव पाटील, सदस्य ज्ञानेश्वर कोळी, खजिनदार शैलेश ठाकुर, महिला उत्कर्ष समितीच्या महाराष्ट्र उपाध्यक्ष सौ आरती पाटील , महाराष्ट्र सचिव ऍडव्होकेट दिव्या लोकरे , नवी मुंबई कार्याध्यक्ष सौ. वर्षा लोकरे यांच्यासह इतर सदस्य हजर होत्या.
या कार्यक्रमासाठी डी वाय पाटील कॉलेजच्या सस्कूल ऑफ पब्लिक हेल्थ विभागाच्या नीदा बानो रिसर्च (रिसर्च Associate) , स्वाती बागल शिर्के (लॅब टेक्निशियन) यांनी महत्वाची भूमिका निभावली.
यावेळी विभागातील साधारणतः 50 महिला भगिनींनी या शिबिराचा लाभ घेतला.
Comments
Post a Comment