आवाज कोकणचा / पनवेल
प्रतिनिधि - अशोक घरत
बुद्ध पौर्णिमा निमित्त कोन गावी मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.
मेड प्युअर सोशल वेलफेअर फाऊंडेशन तसेच लाईफ केअर हॉस्पिटल कर्जत संयुक्त विद्यमाने कोन गाव (पनवेल) येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर ता.२३ रोजी गावच्या बुद्ध विहार मध्ये यशस्वीरित्या संपन्न झाले.
बुद्ध पौर्णिमेनिमित्त आलेल्या मान्यवरांपैकी ग्रुप ग्रामपंचायतच्या उपसरपंच सविता कैलास म्हात्रे आणि त्यांचे यजमान कैलास म्हात्रे तसेच डॉ.सचिन सोनावणे सर यांच्या शुभहस्ते बुद्ध पूजा करण्यात आली.त्यानंतर त्रीसरण वंदना सर्वांनी मिळून केली.
शिबिरामध्ये समीक्षा महाडिक मॅडम यांनी हॉस्पिटलची माहिती आणि संजना कांबळे मॅडम यांनी आपल्या फाऊंडेशनची माहिती दिली. "मेडप्युअर सोशल वेल्फेअर फाउंडेशनची" स्थापना जुलै २०२३ रोजी झाली.या फाउंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी गोरगरीब मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करत असतात.तसेच अनाथाश्रम,
वृद्धाश्रम मधील लोकांना सुद्धा साहित्य वाटप करत असतात.
फाउंडेशनच्या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी दरवर्षी १००० झाडे लावून,ती झाडे जगवण्याचे उपक्रम हाती घेतले आहे.प्रत्येक खेड्यापाड्यात जाऊन लोकांच्या आरोग्य विषयक मार्गदर्शन व मोफत आरोग्य शिबिरं आम्ही राबवत असतो.आतापर्यंत बरीच यशस्वी शिबिरे राबवली आहेत.डॉ.सचिन सोनवणे सर यांनी जिल्हा परिषद मधील शाळेतील काही विद्यार्थी दत्तक घेतले आहेत.दरवर्षी त्या विद्यार्थ्यांना शाळेसाठी लागणारे साहित्य वाटप करत असतो.आतापर्यंत बऱ्याच अनाथ आश्रम व वृद्धाश्रमांना साहित्य वाटप सुद्धा केलेले आहे.
त्यानंतर डॉ.सचिन सोनवणे सर आणि मेडप्युअर सोशल फाउंडेशन यांचे मुख्य उद्दिष्टे काय आहेत,त्याची माहिती सुद्धा देण्यात आली.
सर्वांना शिक्षण मिळावं.
सर्वांचा आरोग्य सुदृढ राहावे त्यासाठी मोफत आरोग्य शिबिर.
झाडे लावून जगवणे म्हणजेच पर्यावरणाचा समतोल राखणे.
समाजातील तळागाळातील लोकांना योग्य मार्गदर्शन करणे.
तरुणांना नोकरीची संधी मिळवून देणे.
पत्रकार अशोक घरत यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले आणि बुद्ध पौर्णिमेनिमित्त तथागत भगवान गौतम बुद्धांबद्दल काही काव्यात्मक बोलले....
*जीवन जगावे येथे,बौद्ध बनून साऱ्यांनी*
*बुद्धांचे तत्त्वज्ञान ते,घ्यावे सर्व मानवानी*
*विश्वशांतीसाठी आम्ही,बुद्धास जाऊ शरण*
*तेव्हा टाळता येईल,जीवसृष्टीचे मरण*
यानंतर डॉ.सोनवणे सर यांच्या मनोगतात बोलताना म्हणाले, शिक्षणाला महत्त्व देण्यासाठी फाउंडेशनच्या माध्यमातून चांगली चांगली कॉलेजेस चालू करण्याचा आमचा माणूस आहे फी कमी आकारली जाईल शिक्षण हे तळागाळातल्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळाले पाहिजे हाच उद्देश यशस्वी करायचा आहे उच्च शिक्षण ही काळाची मुख्य गरज ओळखून हे सार काही केलं जाणार आहे सर्वांनी शिका संघटित व्हा असा संदेश पुन्हा एकदा मला आज च्या बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने देवाचा वाटत आहे आपला आरोग्य फार महत्त्वाचे आहे आरोग्य ठीक नसेल तर तुम्ही काहीही करू शकणार नाहीत म्हणूनच मानसिक आणि शारीरिक आरोग्य हे यांचे संतुलन सारखे ठेवावे लागते.यासाठी रोजच मेडिटेशन साठी पंधरा मिनिटे वेळ देणे गरजेचे आहे रोज मेडिटेशन केल्याने कोणतीच व्याधी तुम्हाला होणार नाही मेडिटेशन म्हणजे मनाची पूर्णतः एकाग्रता करून दीर्घ श्वास घेऊन,तो घेतलेला श्वास हळूहळू सोडणे,यालाच मेडिटेशन असे म्हणतात. असेही त्यांनी शेवटी सांगितले.
मान्यवरांची मनोगते झाल्यानंतर आरोग्य शिबिरास सुरुवात झाली.आरोग्य शिबिरास अतिशय चांगला असा प्रतिसाद लाभला.या आरोग्य शिबिरामध्ये ब्लड प्रेशर,हार्ट रेट,पल्स ऑक्सिमीटर,कार्डियाक मॉनिटर ने तपासणी तसेच ईसीजी आणि मोफत मेडिसिन्स वाटप करण्यात आले.हे शिबिर यशस्वी करण्यासाठी लाईफ केअर हॉस्पिटल चे पूर्ण स्टाफ तसेच एम.एस.डब्ल्यू.एफ चे सर्व मेंबर्सनी अगदी मोलाचे सहकार्य केले.
या कार्यक्रमासाठी लाभलेले मान्यवर ॲड.काळे सर,ॲड. अस्मिता कांबळे,श्री व सौ.बनसोडे,बाळाराम ना. कांबळे,अशोक म्हात्रे,विजय गायकवाड,अजय गायकवाड, जितेश कांबळे,अक्षय गव्हाणे, नरेंद्र जाधव,सुरेश कांबळे, रुपेश कांबळे,बाळाराम कांबळे आदी मंडळी उपस्थित होती. तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन नियोजन प्रशांत बाळाराम कांबळे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने केले. सर्वात शेवटी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे तसेच उपस्थितांचे व आरोग्य शिबिरासाठी आलेली संपूर्ण टीम डॉ. सोनवणे सरांसह या सर्वांचे गोड शब्दांत आभार मानून कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत कांबळे यांनी केले.
Comments
Post a Comment