आवाज कोकणचा / नवी मुंबई
उरण दिनांक 18 जून 24
पत्रकार उत्कर्ष समितीतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न.....
पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र या राज्यस्तरीय पत्रकार समितीच्या माध्यमातून आपली सामाजिक बांधिलकी जपण्याच्या जाणिवेतून उरण तालुक्यातील नवघर येथे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले उरणचे पत्रकार उत्कर्ष समिती सदस्य श्री विशाल डाके यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
समिती अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे व सरपंच सौ. सविता मढवी यांच्या शुभहस्ते सरस्वती, श्री गणेश व शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली . या कार्यक्रमासाठी उपसरपंच विश्वास तांडेल, माजी उपसरपंच रवींद्र भोईर, शाखाप्रमुख अविनाश म्हात्रे, ज्येष्ठ शिवसैनिक ज्ञानेश्वर तांडेल , समाजसेवक मोतीराम डाके , जितेंद्र माळी, चेतन पाटील , परशुराम कोळी शुभम पाटील, नितीन मढवी यांच्यासह समाजातील मान्यवर उपस्थित होते .
शाळेच्या मुख्याध्यापिका सुविद्या म्हात्रे , सौ उषा गावंड , श्री गणेश गावंड, श्री प्रकाश जोशी, श्री प्रसाद म्हात्रे , श्री अनिल म्हात्रे या शिक्षकवृंदा ने या कार्यक्रमासाठी मेहनत घेतली.
यावेळी समिती अध्यक्ष डॉ. म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपली संस्कृती आणि परंपरा यांना जपण्याचे आवाहन केले तसेच देशाचा सुजाण व प्रगल्भ नागरिक होण्यासाठी शिक्षकांचे मार्गदर्शन मोलाची कामगिरी बजावत असल्याचे सांगितले.
पालकांचा इंग्रजी शाळांकडे वाढता कल व त्यातून होणारे दुष्परिणाम तसेच मोबाईलचा अतिवापर यामुळे होणारे विद्यार्थ्यांचे नुकसान यावर डॉ. म्हात्रे यांनी उपस्थित पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी विशाल मोतीराम डाके यांच्या वाढदिवसाचा केक कापून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. श्री विशाल डाके यांच्या या कामगिरीबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Comments
Post a Comment