आवाज कोकणचा / नवी मुंबई 

उरण / पूजा चव्हाण २३ जून २४



नगराजशेठ सीबीएसई स्कूल उरण येथे योग दिवस मोठया उत्साहात साजरा      


          संपूर्ण जगभरात 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला, या योगदिनाचे औचित्य साधून उरण मधील “नगराजशेठ सीबीएसई स्कूल” उरण येथे योग दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.या योगदिनाचा शुभारंभ स्कूलचे व्यवस्थापक तथा जेष्ठ पत्रकार प्रदीप पाटील यांच्या हस्ते श्री गणेश पूजन व श्रीगणेशाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तर साईंच्याप्रतिमेस स्कूलच्या प्रिन्सिपल सौ.ज्योती म्हात्रे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलित करून करणायत आला. 



        यावेळी रेनु सिंग मॅडमने योग विषयक माहिती देताना त्या म्हणाल्या आपल्या कॉलेजदेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजीने संयुक्त राष्ट्र महासभेत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवला होता, आणि त्याचवर्षी 11 डिसेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने हा प्रस्ताव मंजूर केला. इतकेच नाहीतर 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा देखील करण्यात आली या दिवसाला मोठे महत्व देखील आहे, नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या या प्रस्तावाला त्यावेळी तब्बल 177 देशांचा पाठिंबा दिला होता. त्यानंतर 21 जून 2015 हा दिवस जगभरात सर्वात पहिल्यांदा योगा दिवस म्हणून साजरा करण्यात आला.असल्याचे त्या म्हणाल्या. दरवर्षी आंतरराष्ट्रीय योगा दिनाची खास थीम देखील ठेवली जाते यावेळी महिलांना केंद्रित ठेवून ही थीम ठेवण्यात आली आहे. ‘महिला सशक्तिकरणसाठी योग’ अश्या प्रकारची ही थीम असल्याचे त्या म्हणाल्या आणि आज आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळण्यासाठी भारतीय संस्कृतीत वटपौर्णिमेचे व्रत सुहासिनीं करतात हा यांतील केंद्रबिंदू असल्याचे सांगून त्या पुढे म्हणाल्या योगा केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यासाठी मदत होते,असे त्यांनी शेवटी संगीतले.व योगा संदर्भात माहिती दिली.

       यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या योग शिक्षिका सुवर्णा शर्मा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली योगअसनाचे विविध प्रकार सदर केले.या कामी स्कूलच्या प्रिन्सिपल सौ.ज्योती म्हात्रे मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन केले तर शाळेच्या शिक्षिका तेजल फटानिया,रेनु सिंग,देवयानी पाटील,रोशनी,चौव्हान,अंकिता घुमे,आरती सुरवसे, मनाली चव्हाण,शिक्षकेतर कर्मचारी राजश्री घुमे.वृषाली देसाई यांनी योगदिन यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.



Comments

Popular posts from this blog