आवाज कोकणचा / नवी मुंबई
उरण / वशेनी - श्री. कामेश्वर म्हात्रे
महाराष्ट्र गुन्हे तपास पत्रकार टिम उरण विभाग तथा सदाबहार दोस्ती गृप प्रतिष्ठान ९३/९४ बॅच तर्फे पिरकोन काशे डोंगरावर वृक्षारोपण संपन्न..
सदाबहार दोस्ती गृप प्रतिष्ठान तर्फे आज दिनांक २३/०६/२०२४ रोजी सकाळी ठिक ६.४५.वाजता पिरकोन काशे डोंगरावर वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहाने संपन्न झाला.
"पर्यावरणाचा -हास " ही जागतिक समस्या होत असताना, 'पृथ्वीचे वाढत्या तापमान', आणी 'निसर्ग संवर्धन' काळाची गरज ओळखून आज तिस-यांदा मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्यात आली. या लागवडी मध्ये पर्यावरण फणस , आंबा, जांबुळ, चिकू सारखी फळझाडे तर करंज, अर्जून, वड , पिंपळ सारखी जंगली झाडांचे वृक्षारोपण केले . डोंगर, माळरानावर ही झाडे जेव्हा वाढतील, तेव्हा पशूपक्षांना चारा, निवारा, मिळेल, मानवांना फळे, फुले, सावली मिळेल, आणि हिरवागार निसर्ग वाढीमुळे पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन होईल.
या कार्यक्रमाला *श्रीनंदाई प्रतिष्ठान वशेणी , चे अध्यक्ष डॉक्टर हिराचंद पाटील आणि स्वर्गीय कै् लक्ष्मण धर्मा म्हात्रे प्राथमिक सेवा निवृत्त शिक्षक , केंद्रप्रमुख, उत्कृष्ट रंगकर्मी,नाटककार, अध्यात्मिक वारसा पुढे चालवणारे असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व खोपटे यांच्या आठवणी स्मृतिप्रीत्यर्थ, महाराष्ट्र गुन्हे तपास चे पत्रकार श्री कामेश्वर म्हात्रे सदाबहार दोस्ती गृप प्रतिष्ठान चे सदस्य यांनी झाडे दिली आहेत.सारडे विकास मंच चे अध्यक्ष श्री नागेंद्र म्हात्रे सर, *श्री नंदाई प्रतिष्ठान, वशेणी* चे अध्यक्ष डॉ. श्री हिराचंद पाटील सर, पिरकोन गावचे सामाजिक कार्यकर्ते श्री विनायक गावंड सर, गड प्रेमी श्री गणेश भोईर सर व सदाबहार दोस्ती गृप प्रतिष्ठान चे सर्व सदस्य/पत्रकार श्री संतोष जोशी, श्री विजय गावंड श्री सचिन पाटील,श्री अरूण म्हात्रे,श्री जितेंद्र म्हात्रे, श्री कामेशवर म्हात्रे, श्री कैलास पाटील, श्री तुकाराम गावंड, श्री हरिश्चंद्र म्हात्रे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सदाबहार दोस्ती गृप प्रतिष्ठान तर्फे वृक्षारोपण कार्यक्रमांचे सुत्रसंचलन अध्यक्ष श्री तुकाराम गावंड यांनी केले व सर्व मान्यवरांचे आभार श्री हरीचंद्र म्हात्रे यांनी मानले.
.
Comments
Post a Comment