महिला उत्कर्ष समितीतर्फे वटपौर्णिमा निमित्त वृक्षारोपण...
आवाज कोकणचा / नवी मुंबई
प्रतिनिधि 21 जून 24
महिला उत्कर्ष समितीतर्फे वटपौर्णिमा निमित्त वृक्षारोपण व योग दिवस साजरा...
पत्रकार उत्कर्ष समिती या राज्यस्तरीय पत्रकारांसाठीच्या संघटनेचे उपअग असलेली महिला उत्कर्ष समितीच्या राज्यभरातील महिला सदस्य व पदाधिकाऱ्यांनी वटपौर्णिमेचे औचित्य साधत वृक्षारोपण केले .
वाढते शहरीकरण व बदलत्या राहणीमानातील परिस्थितीमुळे परंपरागत साजरे होत असलेले सण ही अनेक वेळा औपचारिकता केल्यासारखे दिसते.
वटपौर्णिमा या दिवशी वटवृक्षाची पूजा करण्याचा प्रघात आहे परंतु वाढत्या शहरीकरणामुळे या वृक्षांची कमतरता दिसून येते वटवृक्ष हा सर्वात जास्त प्रमाणात ऑक्सिजन सोडणारा वृक्ष आहे व पुराणकाळात त्याचे महत्त्व आहे. या वृक्षाची पूजा करण्यासाठी अनेक वेळा त्याच्या फांद्या तोडल्या जातात हाच मुद्दा लक्षात घेऊन पत्रकार उत्कर्ष समिती अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांनी समितीच्या महिला सदस्या व पदाधिकाऱ्यांना वटपौर्णिमेच्या दिवशी एक तरी झाड लावण्याचे आवाहन केले होते व त्यास समितीच्या सदस्य व पदाधिकाऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला .
महिला उत्कर्ष समितीच्या प्रदेश अध्यक्ष डॉ. स्मिता पाटील , कार्याध्यक्ष सौ. श्रुती उरणकर, उपाध्यक्षा सौ. आरती पाटील, कोकण अध्यक्ष सौ ज्योतीका हरयाण , मुंबई अध्यक्ष डॉ. संपदा कारेकर, मुंबई उपाध्यक्षा सौ. सोनाली मेमाणे, ठाणे सदस्या सौ. मानसी मोने, पुणे अध्यक्ष सौ. ज्योती गायकवाड , नवी मुंबई सदस्या अनघा कडू, सिंधुदुर्ग सदस्या सौ. स्वरदा खांडेकर, कुडाळ अध्यक्षा सौ. सुष्मिता राणे, देवगड अध्यक्षा संगीता पाटील, कणकवली सदस्या सौ. छाया कदम, पनवेल सदस्या सौ. आशा चव्हाण, सौ. भारती म्हात्रे, सौ. करुणा पाटील या मान्यवरांनी आपल्या सहकाऱ्यांसह राज्यभरात वृक्षारोपण करून एक वेगळा संदेश दिला आहे.
Comments
Post a Comment