आवाज कोकणचा / ठाणे 

प्रतिनीधी 



अनाथ गरीब गरजु मुले हे समाजाचे उत्तर दायित्व...  गजानन फडकले अध्यक्ष सेवा समाधान फाऊंडेशन



ठाणे मुंबई- रविवार दि. 30 जून रोजी  येऊर ठाणे येथे सेवा समाधान फाऊंडेशन तर्फे विवेकानंद बाल आश्रमातील अनाथ गरीब गरजु मुलाना शालेय वस्तु वाटपाचा कार्यक्रम पार पाडला. त्यावेळी अध्यक्षानी वरील उदगार काढले. याप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते.



आईवडीलांचे छत्र नसलेल्या मुलाना तेवढाच सन्मानाने जगण्याचा हक्क आहे, जेवढा सनाथ मुलाना आहे आणि ही जबाबदारी सर्वस्वी समाजाची आहे. आज हे दायित्व विवेकानंद बाल आश्रम व सदगुरू सेवा ट्रस्ट यशस्वी पणे पार पाडते आहे. हे खरेच कौतुकास्पद आहे. असे विधान गजानन फडकले अध्यक्ष, सेवा समाधान फाऊंडेशन यांनी केले.



यांचे संगोपन, निगराणी व सक्षम नागरिक घडवणे हे खरेच कठीण काम आहे. म्हणूनच याना हातभार लावण्यासाठी आमची संस्था पुढे आली आहे.



यावेळी 40 बालगोपाळ मंडळीना शालेय बॅगा वाटप व अल्पोपहार म्हणून देण्यात आला. 



सुरवातीला सदगुरू सेवा ट्रस्ट चे व्यवस्थापक आनंद सर यानी आपल्या संस्थेबद्दल सविस्तर माहिती दिली, तर विश्वस्त सौ. मानसी मोने व श्री. संदीप राऊळ यानी अनुक्रमे प्रास्तविक उपक्रम व संस्थेची इतर माहिती दिली.



याप्रसंगी अतिथी *डॉक्टर अशोक म्हात्रे संस्थापक अध्यक्ष पत्रकार उत्कर्ष समिति महाराष्ट्र* यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ श्रृतिका तारी यानी पार पाडले तर आभार प्रदर्शन संजय सकपाळ यांनी केले.





Comments

Popular posts from this blog