आवाज कोकणचा / नवी मुंबई
उरण - पुजा चव्हाण
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील यांच्या अचानक जाण्याने पक्षाची मोठी हानी झाली:शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रशांत ( भाऊ ) पाटील यांचे २० जून २४ रोजी हृदय विकाराने अकस्मित निधन झाले .त्यांच्या निधनाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांवर दु;खाचा डोंगर कोसळला आहे.
त्यांच्या निधनाचे हे वृत्त समजताच राष्ट्रवादी कोंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उरण येथील त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन पाटील यांच्या पत्नी व मुलांसह प्रशांत पाटील कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली यावेळी त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार उपस्थित होत्या. प्रशांत पाटील यांच्या प्रतिमेला अभिवादन करून,प्रशांत पाटिल यांची मुले आदित्य , आद्वेत व् पाटील कुटुंबियांची विचारपूस केली. प्रशांत पाटील यांच्या अचानकपणे झालेल्या निधना मुळे पक्षाची मोठी हानी झाली असून राष्ट्रवादी कोंग्रेसवर पक्षावर जवाबदारी वाढली आहे. .प्रशांत पाटील यांचे हे जाण्याचे वय नव्हते, मात्र यांच्या जाण्याने पक्षाची मोठी हानी झाली आहे .उरण तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी झालेल्या अनेक अदोलने आणि मोर्चाचे साक्षीदार असलेला नेता येथील जनतेच्या कायम लक्षात राहील , आम्ही त्यांच्या कुटुंबीयांच्या सोबत आहोत अश्या भावना त्यांनी .सत्ववन करतांना व्यक्त केल्या.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश महिला सरचिटणीस भावना घाणेकर ,माजी आमदार मनोहर भोईर, जेएनपीएचे विश्वस्त दिनेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे उरण तालुका अध्यक्ष मनोज भगत, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संतोष घरत , रायगड जिल्हा युवक उपाध्यक्ष समाधान म्हात्रे ,उरण तालुका युवक अध्यक्ष सचिन पाटील , उरण शहर अध्यक्ष मंगेश कांबळे ,विधानसभा अध्यक्ष गणेश नलावडे , समीर सुर्वे ,माजी नगरसेवक जैद मुल्ला ,उरण शहर शिवसेनासंघटक महेश वर्तक ,, शिवसेना उरण विधानसभा संपर्क प्रमुख महादेव घरत ,भेंडखळ ग्रामपंचायत सदस्य लीलेश्वर भगत ,पुखराज सुथार ;मनोहर ठाकूर, शेकापचे तालुका चिटणीस विकास नाईक, शेकापच्या महिला तालुकाध्यक्ष सीमा घरत, उलवेनोड अध्यक्ष बाबासाहेब पाखरे , तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment