उरणमध्ये लव्ह जिहाद ? युवतीचा अमानुष खून..
उरणमध्ये लव्ह जिहाद ? युवतीचा अमानुष खून....
आवाज कोकणचा / नवी मुंबई
उरण प्रतिनिधी / पूजा चव्हाण
उरण मधील एन आय स्कूलच्या समोर राहणारी यशश्री शिंदे वय वर्ष 22 या युवतीचा अतिशय क्रूरतेने खून करून, उरण कोट नाका पेट्रोल पंपा जवळ अज्ञात स्थळी तिचा मृतदेह सापडला आहे.
गुरुवार पासुन मिसिंग असलेल्या यशश्रीचा मृतदेह सापडला आहे. नवी मुंबई पोलीस क्षेत्रातील बेलापूर येथील अक्षता म्हात्रे या युवतीचा बलात्कार आणि खुनाचा प्रकार ताजा असतानाच हा प्रकार घडला आहे..
अत्यंत क्रूरतेने खून करणाऱ्या त्या नराधमाला तात्काळ पकडून भर चौकात फाशीची शिक्षा दिली पाहिजे.
नराधमांना कायद्याची भीती राहिलेली दिसत नाही. तरी पोलिसांनी क्रूरतेने अत्याचार करणाऱ्या नराधमाला तात्काळ शोधावे व कडक कारवाई करावी. महिलेच्या अत्याचाराबाबत एक प्रकरण ताजे असतानाच , महिलेच्या अत्याचाराचे दुसरे प्रकरण उरण मध्ये घडते. या दोन्ही घटना नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील आहेत.
महिला व मुली नवी मुंबईमध्ये सुरक्षित नाहीत. महिलांच्या अत्याचाराच्या दोन घटना झालेल्या असून त्या भयंकर स्वरूपाच्या आहेत. त्यामुळे महिला व मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून नवी मुंबईतील कायदा व सुव्यवस्था बिघडले असल्याचे वाटते.
महिलांच्या व मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस यंत्रणा अपुरी पडत आहे. याबाबत पोलीस यंत्रणेने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी महिला उत्कर्ष समिती करत असून दोषींना तत्काळ अटक करून कठोऱ्यात कठोर शिक्षा करावी अशी मागणी महिला उत्कर्ष समिती अध्यक्ष डॉ. स्मिता पाटील व आवाज कोकणच्या कार्यकारी संपादिका आरती पाटील यांच्यासह महाराष्ट्रभरातून करण्यात येत आहे.
प्रत्येक घरात महिला सुरक्षित हवी यासाठी या सुरक्षा व्यवस्था लागू झालीच पाहिजे
ReplyDelete