आवाज कोकणचा /  मुंबई

प्रतिनिधि 5 जुलै 24

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभाग प्रदेश कार्यकारी प्रमुख अभिनेत्री सिद्धी कामथ यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार 


 लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात मोठे यश मिळाल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सेल व विभागाच्या वतीने प्रांताध्यक्ष नानासाहेब पटोले यांच्या हस्ते काल दादरच्या श्री. शिवाजी मंदिर नाट्यगृह येथे सत्कार करण्यात आला.  लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र काँग्रेस पक्षाने मोठा विजय मिळवला असून यात प्रदेश काँग्रेसच्या विविध सेल व विभागाचे कार्य महत्त्वाचे ठरले आहे या सर्वांनी राज्यातील गावागावात जाऊन काँग्रेसचा विचार पोहोचवन्याचे काम केले तसेच काँग्रेसच्या पाच न्याय आणि 25 गॅरंटीचे न्याय पत्र घरोघरी पोहोचवण्याचे काम केले आहे.


 लोकसभेच्या प्रचारासाठी माननीय प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले यांनी स्टार प्रचारक म्हणून अभिनेत्री सिद्धी कामथ यांची नियुक्ती केली होती. त्याप्रमाणे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन घरोघरी प्रचार केला होता कॉर्नर सभा घेतल्या होत्या तसेच विविध सभांना उपस्थित राहिल्या होत्या...यासाठीच योगदान बघून नानासाहेब पटोले यांच्या हस्ते शिवाजी मंदिर दादर येथे सत्कार आणि सन्मान करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे महाराष्ट्र प्रदेश चे प्रभारी रमेश चैनीथलाजी, एस. सी. एस. टी. ओबीसी अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय समन्वयक के. राजू ,एस. सी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश लोटिया, अल्पसंख्यांक विभागाचे राज्याचे अध्यक्ष आमदार वजाहत मिर्झा , प्रदेश सरचिटणीस संघटन व प्रशासन श्री. प्रमोद मोरे, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे , सेल व विभागाच्या कॉर्डिनेटर प्रज्ञा वाघमारे , प्रतिभा शिंदे आधी मान्यवर उपस्थित होते.



Comments

Popular posts from this blog