आवाज कोकणचा / नवी मुंबई

उरण प्रतिनिधि - पुजा चव्हाण 

बेकायदेशीर पार्किंग वर उरण वाहतूक शाखेकडून कारवाईचा बडगा.

उरण तालुक्यात उरण पनवेल महामार्गावर तसेच उरण शंकर मंदिर या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूस बेकायदेशीर वाहने ही बेधडकपणे पार्किंग करून जाताना आपल्याला दिसतात. या वाहनांमुळे नेहमी आपल्याला वाहतूक कोंडी होताना दिसते. तसेच या बेकायदेशीर वाहनांच्या पार्किंगमुळे अपघात देखील वाढत असल्याने उरण वाहतूक शाखेमार्फत या वाहनांवर कारवाईचा बडगा उभारलेला आहे.


जानेवारी ते जून या कालावधीत उरण वाहतूक पोलिसांनी 7389 अवजड वाहनांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उभारलेला आहे. तसेच उरण न्हावा शेवा वाहतूक पोलिसांनी देखील उरण करळ ब्उडानपुल व उडानपुच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूस लागणाऱ्या बेकायदेशीर वाहनांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे .


या दंडात्मक कारवाईमुळे आता वाहनांची वाहतूक कोंडी होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बेकायदेशीर वाहने पार्किंग करणारा वर चांगला ताप बसलेला दिसून येत आहे. या बेकायदेशीर वाहने पार्किंग करणाऱ्यांवर उरण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली गलांडे,तसेच न्हावा शेवा वाहतूक पोलीस निरीक्षक जी.एम. मुजावर यांच्यासह वाहतूक पोलिसांनी चांगलीच कंबर कसली आहे.



Comments

Popular posts from this blog