आवाज कोकणचा / नवी मुंबई 

प्रतिनीधी / उरण

पत्रकार उत्कर्ष समितीचा वर्षा सहल , वनभोजन आणि ओळखपत्र वाटप कार्यक्रम संपन्न....


उरण तालुक्यातील दिघोडे रानसई धरणाजवकील रिव्हर व्ह्यू रिसॉर्ट आणि फार्म हाऊस येथे शुक्रवार दिनांक 12 जून रोजी पत्रकार उत्कर्ष समिती या राज्यस्तरीय पत्रकारांच्या संघटनेच्या सदस्य व पदाधिकाऱ्यांचे ओळखपत्र वाटप तसेच वर्षा सहल व स्नेहभोजन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.



कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. यावेळी उपस्थित सर्व सदस्यांना ओळखपत्र देण्यात आली. यावेळी पनवेलचे युवा पत्रकार आदित्य वाघ यांना पुष्पगुच्छ व शुभेच्छा देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला.



यावेळी पत्रकार उत्कर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांनी आगामी वर्षभरात राबविण्यात येणारे विविध उपक्रम यावर विस्तृत चर्चा करून सर्वसहमतीने कार्यक्रम राबविण्याचे सांगीतले.



 तसेच उपस्थित सर्व पत्रकारांना योग्य मार्गदर्शन करताना सांगितले की पत्रकार हा लोकशाही चा चौथा स्तंभ आहे. तसेच ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाविषयी पत्रकारांची कर्तव्य याची देखील जाणीव करून दिली. 



याचबरोबर सध्याच्या प्रिंट आणि डिजिटल पत्रकारिता करताना पत्रकारिता कोर्स करणे आवश्यक असल्याचे देखील त्यांनी सांगितले. 




या कार्यक्रमासाठी समितीचे सचिव डॉ. वैभव पाटील, खजिनदार शैलेश ठाकुर, सदस्य ज्ञानेश्र्वर कोळी , कोकण कार्याध्यक्ष अलंकार भोईर, कोकण उपाध्यक्ष लालचंद यादव, रायगड उपाध्यक्ष व वरिष्ठ पत्रकार मिलिंद खारपाटील, पेण सदस्य अक्षय पाटील, अमोल येरणकर,



 संजय गुप्ता, जितेंद्र तांडेल यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.





Comments

Popular posts from this blog