फुंडे हायस्कूलची वारकरी दिंडी व वृक्ष दिंडी.....

 फुंडे हायस्कूलची  वारकरी दिंडी व वृक्ष दिंडी.....

 उरण / मिलिंद खारपाटील

        महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा सण म्हणजेच आषाढी एकादशी होय. आषाढी एकादशी निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठल नामाच्या जयघोषात रंगून गेला आहे. वारकरी पंढरपुराच्या दिंडीत सहभागी झाले असताना फुंडे हायस्कूलचे विद्यार्थी देखील वारकरी  दिंडीत  रममाण झाले.उरण तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेचे, तुकाराम हरी वाजेकर माध्यमिक विद्यालय फुंडे येथील विद्यार्थ्यांची वारकरी दिंडी व वृक्षदिंडी मंगळवार दिनांक 16 जुलै 2024 रोजी नवघर गावात काढण्यात आली होती. सुरुवातीला विद्यालयाचे चेअरमन श्री कृष्णाजी कडू साहेब, विद्यालयाचे प्राचार्य श्री एम. जी. म्हात्रे सर, ज्युनिअर कॉलेज प्रमुख श्री व्ही के कुटे सर आणि सर्व शिक्षक वृंद यांच्या हस्ते विठुरायाच्या पालखीचे पूजन करण्यात आले.श्री एस डी म्हात्रे, श्री एच एन पाटील, श्री एस  डी नाईक, श्री. पाटील पी. ए. श्री. दिगंबर पाटील, सर्व सेवक आणि विद्यार्थी यांनी आरती म्हटली.त्यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विठ्ठल भक्तीचा गीतांवर अप्रतिम नृत्य सादर केले. श्रीम. अस्मिता पाटील मॅडम यांनी बसवलेल्या लेझीम पथकाने देखील उत्तम सादरीकरण केले. इयत्ता दहावी ब च्या वर्गाने वर्गशिक्षिका सौ.आर. एन. पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाची छान तयारी केली होती. 

            


        तदनंतर टाळ, विठू नामाचा जयघोष  आणि लेझीमच्या तालावर विद्यार्थ्यांच्या  वारकरी दिंडी आणि वृक्ष दिंडीने नवघर गावाकडे प्रस्थान केले. नवघर ग्रामस्थांनी वारकरी दिंडीचे मनःपूर्वक स्वागत केले.नवघर ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि नवघर ग्रामस्थ  यांच्यावतीने सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपार वाटप करण्यात आला. कुमार नचिकेत म्हात्रे आणि कुमारी लक्ष्मी मोटे या विद्यार्थ्यांनी सुरेल आवाजात भक्तीगीतांचे गायन करून सर्वाना मंत्रमुग्ध केले. याप्रसंगी नवघर ग्रामपंचायत सरपंच सौ सविता मढवी,उपसरपंच व स्कूल कमिटी सदस्य श्री विश्वास तांडेल, ग्रामपंचायत सदस्य सौ. प्रियदर्शनी म्हात्रे,श्री. कुंदन कडू,सौ रंजना भोईर, देवयानी तांडेल, माजी उपसरपंच श्री. रवी वाजेकर,सामाजिक कार्यकर्ते विजय तांडेल,ग्रामसुधारणा मंडळ अध्यक्ष प्रणय कडू, योगेश तांडेल, भूपेंद्र पाटील,प्रशांत पाटील, संकेत तांडेल, अजय भोईर, अविनाश म्हात्रे,हसुराम भोईर, परेश पाटील उपस्थित होते. ही दिंडी यशस्वी होण्यासाठी उरण वाहतूक शाखा  आणि उरण पोलीस स्टेशन या दोन्ही पोलीस अधिकारी वर्गाचे उत्तम सहकार्य लाभले. सांकृतिक विभाग प्रमुख श्री एच एन पाटील सर आणि सर्व शिक्षक वृंद यांनी मिळून या कार्यक्रमाचे छान नियोजन केले होते.

Comments

Popular posts from this blog