आवाज कोकणचा / नवी मुंबई

उलवे नोड / प्रतिनिधि 



महिला उत्कर्ष समितीच्या वतीने गुरुजनांचा सन्मान ..

नवी मुंबई कार्याध्यक्ष सौ. वर्षा लोकरे यांच्या संकल्पनेतून गुरूंविषयी व्यक्त केली कृतज्ञता....



पत्रकार उत्कर्ष समिती या राज्यस्तरीय पत्रकारांच्या समिती अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या नवी मुंबई कार्याध्यक्ष सौ वर्षा लोकरे यांनी गुरुपौर्णिमे चे महत्त्व लक्षात घेत श्री छत्रपती शिवाजी विद्यालय गव्हाण कोपर येथील शिक्षकांचा सन्मान केला. गुरुचे मानवी जीवनातील योगदान हे अनन्य साधारण आहे .



योग्य गुरुमुळे देशभक्त नागरिक, नविन यशस्वी पिढी आणि गुरूंच्या शिकवणीमुळे जीवन यशस्वी होते. 



महिला उत्कर्ष समितीच्या प्रदेश सचिव ॲडवोकेट दिव्या लोकरे यांनी या दिवसाचे अनन्य साधारण महत्व विशद केले यावेळी समितीच्या सदस्या सौ शारदा वेदांते , सौ मीरा जाधव उपस्थित होत्या. 



श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री गोडगे जी सी , उपमुख्याध्यापक श्री मंडले , पी बी , रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर श्री भोईर आर.एस., श्रीमती पाटील एच आर , सौ ठाकूर एस. एस , श्री चौधरी आर एन , श्री पाटील यु डी , सौ पाटील वाय एस , सौ वर्तक डी आर , श्रीमती गोंधळी यु जी, श्री भोईर एस के , श्री म्हात्रे एस एच, , सौ पाटील सी एम यांच्यासह शिक्षक वृंद उपस्थित होता.



सूत्रसंचालन श्री रंधवे एस एस यांनी केले. यावेळी शिक्षिका हर्षदा घरत यांनी गुरुने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा या शब्दात आपले मत व्यक्त केले.. 





Comments

Popular posts from this blog