आवाज कोकणचा /  नवी मुंबई 

पनवेल / प्रतिनिधी



भजन सम्राट पंडित निवृत्ती बुवा चौधरी यांचा  गुरुपूजन सोहळा उत्साहात संपन्न......


नवी मुंबई सह महाराष्ट्रातील राज्यस्तरीय भजन सम्राट पुरस्कार विजेते पंडित निवृत्ती बुवा चौधरी यांचा त्यांच्या शिष्यांनी आयोजित केलेला गुरुपूजन सोहळा मोठ्या दिमाखात साजरा झाला. 


श्री गणेश , माता सरस्वती व संगीत भूषण वैकुंठवासी राम मराठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली .


पत्रकार उत्कर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे , संगीत भूषण वैकुंठवासी राम मराठे यांचे पट्ट शिष्य पंडित राजेंद्र मनेरीकर , ज्येष्ठ भजन गायक वसंत शेठ पाटील यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमास होती.


नवी मुंबई , पुणे सातारा या विभागातून महाराष्ट्र भजन म्राट पंडित निवृत्ती बुवा चौधरी यांचे शिष्य  शिवमाला पाटील, कृष्णा पवार, रामचंद्र वाघमारे, सर्वेश म्हात्रे , कृष्णा अंदाडे , सुदाम चौधरी , बाळू पांढरे , हरिचंद्र पालव , नितीन ठाकूर , जगदीश म्हात्रे , जगन्नाथ मढवी , देवानंद कोळी , केशव पाटील , रमाकांत भोईर , अनंत पाटील , महादेव पाटील , ज्ञानेश्वर पाटील , तुकाराम काठे या या शिष्यांनी आपले सूर - ताल - लय उत्कृष्टपणे जपत आपल्या धारदार आवाजात विठुरायाच्या  गजर करत तसेच वेगवेगळ्या धाटनितली संगीतमय भजनकला सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.

श्री निवृत्ती बुवा चौधरी यांचे भजन गायन या क्षेत्रात मोठे योगदान असून राज्यभर त्यांचे नाव आहे त्यांचा संपूर्ण परिवार हा त्यांच्या साथीला राहून ही कला जपण्यासाठी ते अहोरात्र मेहनत घेत असतात त्यांच्या या कार्याचा समाजातील विविध क्षेत्रातून नेहमीच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. 



Comments

Popular posts from this blog