आवाज कोकणचा / नवी मुंबई 

प्रतिनिधी 

महिला उत्कर्ष समितीच्या मागणीला यश




शिळफाटा येथे घडलेल्या अक्षता म्हात्रे सामूहिक बलात्कार आणि खुनाच्या घटनेचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार..



विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना.....



शिळफाटा येथील मंदिरात आश्रयासाठी गेलेल्या एका महिलेवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेचा जलदगतीने तपास करण्यात येईल.  याप्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टीने लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करुन हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा. तसेच या प्रकरणी विशेष सरकारी वकिल म्हणून ज्येष्ठ विधीज्ञ  उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे, नवी मुंबई पोलीस आयुक्त आणि गृह विभागाचे प्रधान सचिव यांना दिल्या.

पत्रकार उत्कर्ष समिती या राज्यस्तरीय पत्रकार समिती अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या  प्रदेश अध्यक्ष डॉ. स्मिता पाटील यांनी ईमेल द्वारे  मुख्यमंत्र्यांना तर समितीच्या कार्याध्यक्ष श्रुती उरणकर, उपाध्यक्ष आरती पाटील , सचिव एडवोकेट दिव्या लोकरे , संघटक नीता माळी , कोकण अध्यक्ष ज्योतीका हरयाण ,नवी मुंबई अध्यक्ष सुजाता कडू , कार्याध्यक्ष वर्षा लोकरे , सिंधुदुर्ग अध्यक्ष दीपा ताटे,  पुणे अध्यक्ष ज्योती गायकवाड,    अकोला अध्यक्ष सुनिता इंगळे , तुर्भे अध्यक्ष वंदना अंबवले , गुहागर अध्यक्ष सुवर्णा पागडे व विना काश्टे , मुंबई अध्यक्ष डॉ. संपदा कारेकर यांनी आपापल्या विभागात सहकाऱ्यांसह  पोलिसांकडे एका निवेदनाद्वारे या प्रकरणाचा तपास जलद गती न्यायालयात चालवून दोषींना फासावर लटकवण्याची मागणी केली होती.


याबाबत  मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक विचार करून 
ही अत्यंत गंभीर घटना असून याप्रकरणी ठाणे आणि नवी मुंबई पोलीसांकडे एफआयआर दाखल करण्यात आला आहे. घटना शिळफाटा, ठाणे येथे घडली असून तेथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबरोबरच महिलेच्या आई-वडिलांच्या तक्रारीवरुन नवी मुंबई पोलीसांकडे ४९८ ए कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास चांगल्या पद्धतीने आणि जलदगतीने करण्यात यावा, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत.



Comments

Popular posts from this blog