आवाज कोकणचा / पेण 

अरुण चवरकर 

गोवा कोकण हायवेवर अपघातांची मालिका सुरूच


मुंबई गोवा हायवेचे काम आज कित्येक वर्षे सुरू असुन अनेक वेळा  स्थानिक नागरिकांनी विवीध ठिकाणीं रास्ता रोको आंदोलन करण्यात आली  आहेत. 



पनवेल ते इंदापूर विभागातील काही ठिकाणी रस्ते झाले पण रस्त्याच्या कडेला ज्या साईड पट्ट्या आहेत त्या साईड पट्या भरलेल्या नसल्याने मोटारसायकल स्वारांचे  पावसामुळे व खराब रस्त्यांमुळे  तोल जाऊन दररोज अपघात होऊन अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत किँवा  कायमचे जायबंदी व्हावे लागत आहे. 



अनेक जण दवाखान्यात मरण यातना भोगत आहेत अनेकांचे कुटुंब उध्वस्त होत आहेत याला जबाबदार कोण ? 

कालच पेण तालुक्यातील जिते गावाजवळ झालेला अपघातात दोन तरूण रस्त्यावर पडले परवा खरपाडा येथे एक तरूण मरण पावला . या कोकण हायवेवरून ऐवढे लोकप्रतिनिधी ये जा करतात पण यांना ह्या साईड पट्या दिसत नाही का असे अनेक प्रश्न येथील नागरिक प्रत्येक गावात चर्चेचा विषय बनला आहे तर शासनाने व लोकप्रतिनिधींनी या कडे लक्ष देऊन पनवेल ते इंदापूर मार्गाच्या साईड पट्यांचा प्रश्न सोडवून काही प्रमाणात का होईना आपघाता पासून वाचवावे अशी मागणी येथील जनता करत आहे. 







Comments

Popular posts from this blog