आवाज कोकणचा / नवी मुंबई
उरण प्रतिनीधी - पुजा चव्हाण
नगराजशेठ सीबीएसई इंटरनॅशनल स्कूल मध्ये आषाढी एकादशी सोहळा मोठया उत्साहत साजरा.
विठ्ठलाच्या नाम गजराने रंगली विद्यार्थ्यांची वारी
आज संपूर्ण स्कूल मधील वातावरण विठलाच्या नामस्मरणाने दुमदुमून गेले होते,नेहमीच्या गणवेशांतील विद्यार्थी आज वारकऱ्यांच्या पारंपारिक वेशभूषेत स्कूल मध्ये उपस्थित होते.प्रत्येकाला उत्सुकता होती ती वारी काढण्याची आशा मंगलमय वातावरणाचा शुभारंभ स्कूलचे प्रशासक तथा जेष्ठ पत्रकार प्रदीप पाटील यांच्या हस्ते श्रीगणपती.माता सरस्वती देवीच्या मूर्तीस व स्कूलच्या प्रिन्सिपल सौ.जोत्यी म्हात्रे यांच्या हस्ते विठ्ठल-रुमिणीच्या मूर्तीस पुष्पहार घालून व दीप प्रज्वलन करून करण्यात आला. यावेळी आपल्या सुस्वर आवाजात प्रिन्सिपल सौ.जोत्यी म्हात्रे यांनी विठ्ठलाची पारंपारिक आरती गाऊन करण्यात आला.
संपूर्ण भक्तीमय पार पडलेल्या सोहळ्या प्रसंगी स्कूलच्या शिक्षिका रेनु सिंग यांनी हिंदी,तेजल फटानिया मॅडमयांनी इंग्रजीमधून तर दिव्यानी पाटील मॅडम यांनी मरठी मधून आषाढी एकादशी साजरी करण्या बाबत माहिती दिली.या बरोबरच विद्यार्थ्यांनीही या सोहळ्याच्या संदर्भात महिती सांगितली.
नंतर विद्यार्थ्यांनी स्कूलच्या मैदानावर टाळांच्या व विठ्ठलाच्या नाम गजरात पालखी-दिंडीची मिरवणूक काढून संत तुकाराम महाराज यांनी “वृक्षवल्ली आम्हा सोयरीं वनचरें |” आपल्या अभंग वाणीत म्हटल्या प्रमाणे यावेळी श्रीफळाच्या वृक्ष रोपणाचा कार्यक्रम करून करून दिंडी स्कूल मध्ये परत आली. कार्यक्रम यशस्वी करण्या साठी स्कूलच्या प्रिन्सिपल सौ.ज्योती म्हात्रे,यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिका तेजल फटानिया,रेनु सिंग,दिव्यांनी पाटील,रोशनी चौव्हान,अंकिता घुमे,आरती सुरवसे,शिक्षकेतर कर्मचारी सौ.राजश्री घुमे,सौ.वृषाली देसाई आदींनी मेहनत घेतली.
Comments
Post a Comment