आवाज कोकणचा / नवी मुंबई
कै.गोपाळ नारायण अक्षीकर शैक्षणिक संकुलात गुरुपौर्णिमेचा सोहळा उत्साहात साजरा
आज गुरुपौर्णिमेनिमित्त कै.गोपाळ नारायण अक्षीकर शैक्षणिक संकुलाच्या एन.आय.स्कूल मध्ये गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यानंतर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालकतथा या सोहळ्याचे अध्यक्ष सदानंद जी गायकवाड शाळेचे माजी विद्यार्थी अचल राजेंद्र शिंदेतर पत्रकार म्हणून शाळेची माजी विद्यार्थिनी पूजा चव्हाण उपस्थित होत्या मान्यवरांच्या स्वागताने आणि गौरव गीत गाऊन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हास्ते इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यानंतर गुरु शिष्य पुरस्कार प्राप्त सौ. पेंडसे मॅडम सौ. कोठावदे मॅडम यांनाही सन्मानित करण्यात आले.
यावेळी इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांची अतिशय सुंदर मुलाखत शाळेतील शिक्षक एस. एस. पाटील सर यांनी घेऊन इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसमोर आपण आपला अभ्यास कसा करावा या विषयाचे मार्गदर्शन केले.
यानंतर प्रमुख पाहुणे अचल शिंदे व कार्यक्रमाचे अध्यक्ष सदानंद जी गायकवाड यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी व शिक्षक जगताप सर यांनी गुरुपौर्णिमेविषयक माहिती सांगितली.इयत्ता 10च्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतिशय सुंदर केले,कार्यक्रम यशस्वी करण्या साठी शाळेचे मुख्याध्यापक श्री भोये सरव पर्यवेक्षीका पेंडसे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सहशालेप्रमुख एस.जे. कांबळे सर व सौ. यादव मॅडम. जनरल एज्युकेशनच्या क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्ष सौ दिपाली म्हात्रे यांनी सहकार्य केले कार्यक्रमाच्या शेवटी श्री खमार्टेसर यांनी पसायदान गाऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Comments
Post a Comment