आवाज कोकणचा / नवी मुंबई
उरण - प्रतिनिधी
पत्रकार उत्कर्ष समिती रायगड जिल्हा उपाध्यक्ष व महामुंबई चॅनेल चे संपादक श्री. मिलिंद खारपाटील यांच्याकडून पुस्तके भेट....
रायगड जिल्ह्यातील आदर्श शिक्षक कै गजानन गणू खारपाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ, त्यांचे कनिष्ठ पुत्र, पत्रकार उत्कर्ष समिती रायगड उपाध्यक्ष व महामुंबई चॅनेल चे संपादक , जेष्ठ पत्रकार श्री मिलिंद खारपाटील यांनीआज दिनांक ८ जुलै रोजी रयत शिक्षण संस्थेच्या तुकाराम हरी वाजेकर विद्यालयास ७० पुस्तके भेट दिली.
आतापर्यंत त्यांनी सेकंडरी स्कूल चिरनेर, के गो लिमये वाचनालय पनवेल, न्यू इंग्लिश स्कूल पनवेल, वासुदेव बळवन्त फडके हायस्कूल पनवेल, साने गुरुजी वाचनालय नेरे शांतीवन, रयत शिक्षण संस्थेचे वावरले हायस्कूल, तालुका वाचनालय पोलादपूर, गजानन महाराज वाचनालय गिम्हवणे दापोली, साने गुरुजी वाचनालय भापट , म्हसळा, सार्वजनिक माध्यमिक विद्यालय रावे..पेण, मातोश्री विद्यामंदिर देवनार, मुंबई, केशवराव खांबेटे वाचनालय म्हसळा, लोकमान्य टिळक वाचनालय चौक , तु ह वाजेकर विद्यालय फुंडे या आणि इतरही काही वाचनालयाना आत्तापर्यंत ५ लाख रुपये किंमतीची पुस्तके भेट दिली आहेत.
रायगड जिल्हा परिषदेने आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित कै गजानन खारपाटील गुरुजी यांनी विद्यार्थ्यांना वाचाल तर वाचाल हा संदेश दिला होता.
यावेळी फुंडे हायस्कूलचे प्राचार्य श्री एम. जी. म्हात्रे , ज्युनिअर कॉलेज प्रमुख श्री. व्ही. के. कुटे , शिक्षिका सौ. दर्शना माळी आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment