आवाज कोकणचा / खोपोली
तुषार कांबळे
बी आर एस पक्षाचा अब की बार दरोडेखोर सरकार ?
तुषार तानाजी कांबळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश सचिव यांचा सवाल...
मुंबई : तेलंगणा च्या भारत राष्ट्र समिती चे महाराष्ट्रातील नेते शंकर आण्णा धोंडगे यांच्या फौजदारी प्रकरणांचा तपशील निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवरून घेण्यात आला आहे.
तेलंगणा चे माजी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांना महाराष्ट्र म्हणजे बंगाल , युपी , बिहार वाटतोय का? म्हणून त्यांनी शेतकऱ्यांचे सरकार स्थापन करण्याच्या नावाखाली एक दरोडेखोरी, दंगली संबंधी घातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हे दाखल असलेला नेता महाराष्ट्रासाठी निवडला याचं उत्तर महाराष्ट्राला दिले पाहिजे. चंद्रशेखर राव यांना महाराष्ट्रात अब की बार गुन्हेगार सरकार बनवायचे आहे का? असे म्हणत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश सचिव तुषार तानाजी कांबळे यांनी सवाल केला आहे .
त्या साठी शंकर धोंडगे यांची निवडणूक प्रतिज्ञापत्रातील गुन्हेगारी पार्श्वभूमी मांडली आहे .
संबंधित आरोप (IPC कलम-395)
• • धोकादायक शस्त्रे किंवा साधनांनी स्वेच्छेने दुखापत करण्याशी संबंधित आरोप (IPC कलम-324)
② लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी प्राणघातक हल्ला किंवा गुन्हेगारी शक्तीशी संबंधित आरोप (IPC कलम-353)
● लोकसेवकाने फसव्या हेतूने वापरलेले टोकन धारण करणे किंवा बाळगणे यासंबंधीचे शुल्क (IPC कलम- 71)
• • दंगलीसाठी शिक्षेशी संबंधित आरोप (IPC कलम-147)
● दंगलीशी संबंधित आरोप, प्राणघातक शस्त्राने सज्ज (IPC कलम-148)
● बेकायदेशीर असेंब्लीच्या प्रत्येक सदस्याशी संबंधित आरोप सामान्य वस्तूच्या खटल्यात केलेल्या गुन्ह्यासाठी दोषी आहेत (IPC कलम-149)
• गैरव्यवहाराशी संबंधित आरोप (IPC कलम-425)
• इतरांचा जीव किंवा वैयक्तिक सुरक्षितता धोक्यात आणणाऱ्या कायद्याशी संबंधित आरोप (IPC कलम-336)
● चुकीच्या प्रतिबंधाशी संबंधित आरोप (IPC कलम-341)
• अनेक व्यक्तींनी समान हेतूने केलेल्या कृत्यांशी संबंधित आरोप (IPC कलम-34) या प्रकारचे गुन्हे आहेत हे देखील त्यांनी स्पष्टपणे दाखवले आहेत आणि महाराष्ट्राचे बंगाल , युपी, बिहार होऊ नये अन्यथा महाराष्ट्र भर आंदोलन केले जाईल असे महाराष्ट्र प्रदेश सचिव तुषार कांबळे यांनी म्हटले आहे.
Comments
Post a Comment