आवाज कोकणचा / पुणे
प्रतिनिधि / गणेश कांबळे
IAS अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांना अटक, शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवणं भोवलं
पुणे : दि. १८. परिविक्षाधीन आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची कारकीर्द वादग्रस्त ठरल्याने त्या चर्चेत आहेत. तसेच त्यांच्या निवडीबाबतच्या कागदपत्रांवरूनही आरोप केलेले असून त्याची चौकशी सुरु आहे. या सर्व घडामोडीच्या दरम्यान पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्याविरोधात मुळशी तालुक्यातील शेतकऱ्याच्या जमिनीचा ताबा घेतेवेळी पिस्तूल रोखणे आणि मारहाण प्रकरणी पौड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र दरम्यान मनोरमा खेडकर या बेपत्ता झाल्या होत्या. अखेर आज पौड पोलीसांनी महाडा येथील एका फार्म हाऊस येथून त्यांना ताब्यात घेतले आहे. मनोरमा खेडकर यांना आता पुण्यात आणण्यात येत आहे.
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातल्या धडवली गावात खेडकर कुटुंबाने एक वादाची जमीन खरेदी घेतली होती. या जमिनीचे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. त्यामुळे बाजूच्या शेतकऱ्यांनी विरोध केला होता. त्यावेळी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर या बाउन्सर अन् गुंड घेऊन त्या ठिकाणी पोहोचल्या. त्यांनी हातात पिस्तूल घेऊन या शेतकऱ्यांना धमकावले होते.
वर्षभरापूर्वीच्या या प्रकाराचा हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर गुन्हा दाखल झाला होता.अधिक तपास पौड पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी करीत आहे..
Comments
Post a Comment