आवाज कोकणचा
पेण / अरूण चवरकर
जनता हायस्कूल गडब च्या एस एस सी ८६ विद्यार्थ्यांचा स्नेहबंध सोहळा संपन्न....
पेण तालुक्यातील जनता हायस्कूल गडब चे १९८६ बॅचचे विद्यार्थी अतिशय गरिबीतून शिक्षण घेऊन मिळेल ते काम करून उदरनिर्वाह चालवत आता हे वयाची 53 वर्ष पूर्ण केले आहेत तरी त्यावेळची भौगोलिक परिस्थिती वर मात करून त्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हे एकत्र आले होते आणि वर्षातून एकदिवस वर्ग मीत्रांन साठी सर्व काम बाजूला ठेवून आज हे विद्यार्थी विविध क्षेत्रात शैक्षणिक, राजकीय अनेक क्षेत्रातआपले नाव लौकीक करीत आहेत ते आज पेण मधील पाबळ निसर्ग रम्य ठिकाणी फार्म हाऊसवर साजरा करताना
ह्याच ग्रुपचे माजी रायगड जिल्हा परिषद चे अर्थ व बांधकाम सभापती संजय जांभळे व त्यांच्या पत्नी कै. जोती संजय जांभळे (जिल्हा परिषद सदस्य) यांना देवाज्ञा झाली त्यांना व ह्याच ग्रुपची विद्यार्थीनी मंजूला चवरकर यांच हि निधन झाले यांना श्रध्दांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात केली .
सुरवातीला जांभळे यांनी सतत तीन वर्षे स्व खर्चाने विद्यार्थ्यांना एकत्र केले नंतर जांभळे यांनी आज आपले मनोगत व्यक्त केले तेव्हा म्हणाले जाणिव 86 ग्रूप मुले मी निवडून आलो आणि आजही हे विद्यार्थी मला विसरले नाहीत आणि मी ही केव्हा विसरणार नाही आणि दिपावली मध्ये सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनी एकत्रित कार्यक्रम करन्याची जबाबदारी जांभळे आणि हेमंत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले ह्या ग्रुपच वैशिष्ट्य ग्रुप मधिल सुख दुःखात लगेच धाऊन येणारा म्हणून ओळख सर्वत्र विखुरलेले विद्यार्थी एकत्रित झाले आणि मग रमल्या जुन्या गप्पा जूण्या आठवणींना उजाळा दिला मग नाच ,गाणी धम्माल करून आलिंगन देत निरोप घेतला ह्या कार्यक्रमासाठी संजय जांभळे, हेमंत पाटील, संतोष चांदोरकर, दिलीप पाटील, दिगंबर पाटील, मोरेश्वर मोकल, चंद्रकांत शिर्के,किशोर पाटील, दिनकर पाटील, जनार्दन जांभूळकर, प्रदिप पाटील, कमलाकर पाटील नरेंद्र पाटील, प्रकाश ठाकूर अरूण चवरकर, संजय चवरकर खूप मेहनत घेतली.
Comments
Post a Comment