आवाज कोकणचा / नवी मुंबई
प्रतिनिधी / कळंबोली
रोडपाली येथे नारळी पौर्णिमा सण उत्साहात साजरा युवा कार्यकर्ते योगेश पगडे यांचा पुढाकार..
नारळी पौर्णिमा म्हणजेच कोळी समाजातर्फे समुद्राची पूजा चर्चा करून व नारळ अर्पण करून कोळी राजाला मच्छीमारीसाठी समुद्रात जाण्यापूर्वी खवळलेल्या समुद्राला शांत होण्यासाठी प्रार्थना करण्याचा सोहळा.
पावसाळ्यापूर्वी समुद्र अशांत असतो अथांग लाटा , जोरदार पाऊस अशा खवळलेल्या समुद्रात हा कोळी राजा जात नसतो .
नारळी पौर्णिमा या दिवशी समुद्राची यथासांग पूजा करून व त्याला नारळ अर्पण करून त्या दिवसापासून हा कोळी राजा मच्छीमारीसाठी तयार होतो.
आपली ही संस्कृती परंपरा कायम टिकून राहावी , येणाऱ्या नवीन पिढीला त्याची माहिती मिळावी यासाठी रोडपाली गावचे युवा कार्यकर्ते, कोळी समाज मच्छीमार कृती समिती अध्यक्ष व कांदळवन सहव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री योगेश पगडे हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात.
कासाडी नदी खाडी किनारी नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने त्यांनी समाजातील विविध स्तरातील लोकांना एकत्र आणत समुद्र पूजन व निसर्गपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
या कार्यक्रमासाठी पर्यावरण संशोधक यशवंत सोनटक्के मत्स्य अभ्यासक प्रदीप पाताडे, तळोजा मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष संदीप डोंगरे, पोलीस निरीक्षक श्री घाडगे, वन परिक्षेत्राधिकारी समीर शिंदे , वन विभाग रायगडचे अधिकारी बालाजी वाघमारे , कळंबोली पोलीस ठाण्याचे अधिकारी गोरिवले, काँग्रेस कार्याध्यक्ष अभिजीत पाटील , ज्येष्ठ नेते यशवंत शेठ ठाकूर , नरेश पाटील , पंचायत समिती सदस्य गुरुनाथ ठाकूर, पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे , पत्रकार दीपक कांबळे, ज्येष्ठ पत्रकार विकास पाटील, पनवेल महानगरपालिकेचे अभियंता राहुल जाधव यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
योगेश पगडे यांच्या या कामाची दखल अनेक वेळा शासकीय स्तरावर घेतली गेली असून ते शासनाच्या विविध उपक्रमात नेहमीच सहभागी होत असतात.
आजची युवा पिढी भरकटलेली दिसते अनेक वेळा त्यांच्या हाताला काम नसल्यामुळे ते दिशाहीन होताना दिसतात. यासाठी योगेश पगडे यांनी कांदळवन सह व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी पुढाकार घेतला असून त्यात लवकरच त्यांना सुयश मिळेल अशी आशा आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी योगेश पगडे यांनी वर्ल्डआर्टच्या कलाकारांना बोलावून त्यांच्या कारिगारीचा नमुना उपस्थित त्यांना दाखवला अवघ्या पाच मिनिटांच्या आत मध्ये उपस्थित यांचे उभ होऊ स्केच तयार करून उपस्थितांची मने जिंकली.
त्यांच्या या कामाचे कार्याचे समाजातील विविध स्तरातून कौतुक होत असून त्यांच्यावर अभिनंदन याचा वर्षाव होत आहे.
Comments
Post a Comment