आवाज कोकणचा / पेण
अरूण चवरकर
आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शिर्कि ग्रामस्थांना फळझाडे व छत्र्या वाटप कार्यक्रम संपन्न...
पेण शिर्कि येथील आण्णाई फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे सचिव कल्पेश पाटील व अध्यक्षा सौ वंदना म्हात्रे यांनी पनवेल चे आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त दादांचे आशीर्वाद घेऊन शिर्की ग्रामस्थांना घरोघरी जाऊन एक हापूस आंब्याचे कलम झाड व एक छत्री देऊन वाढदिवस साजरा केला.
हजारो आंब्याची रोपे वाटण्या मागे कल्पेश पाटील यांनी त्यांचे मनोगत मांडताना म्हटले की माझा गाव व परीसर हिरवागार होऊन येथील वातावरण थंड राहण्यास मदत होइल तसेच शुद्ध हवा मिळाल्यामुळे गावकऱ्यांचे आरोग्य सुदृढ होईल.
माजी उपसरपंच कल्पेश पाटील हे राजकरण्यापेक्षा समाजकारणावर जास्त लक्ष देत असल्यामुळे खारीपाट विभागातील दानशूर व्यक्ती अशी त्यांची ओळख आहे.या विभागातील नागरिकांवर वेळी अवेळी कोणताही प्रसंग आला जसे शेतीविषयी, दवाखान्यात जाण्यासाठी, पोलिस स्टेशन चा प्रश्न, मंदिर, शाळा,कला, क्रिडा केव्हाही कुठेही फक्त हाक मारा मदतीला धावून येणारा अशी त्यांची प्रतिमा आहे.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वर असलेले प्रेम व त्यांची कार्यशैली याच्यामुळे आज या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी कल्पेश पाटील, वंदना म्हात्रे, आणि मित्र परिवार तसेच शिर्कि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment