आवाज कोकणचा / नवी मुंबई
प्रतिनिधि/ उरण
आवरे येथे रक्तदान शिबिर संपन्न डॉ. हिराचंद पाटील व तुकाराम गावंड यांचे मोलाचे योगदान ...
पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली श्री गणेश व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व श्रीफळ वाढवून या रक्तदानाच्या शिबिराला सुरुवात झाली.
उरण तालुक्यातील वाढते औद्योगीकरण व मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक यामुळे या भागामध्ये अपघातांचे प्रमाणही मोठे आहे. आज पर्यंत अनेक निष्पाप लोकांचे बळी या अपघातात गेले आहेत तर काही जन्मभरासाठी जायबंदी झाले आहेत .
असे अपघात घडल्यानंतर अत्यंत तातडीने सर्वात अगोदर गरज भासते ती रक्ताची. अनेक मृत्यू हे अतिरक्तस्रावामुळे होत असतात रक्ताची ही निकड लक्षात घेऊन नांदाई प्रतिष्ठान वशेणीचे अध्यक्ष व सामजिक कार्यकर्ते डॉ. हिराचंद पाटील व सदाबहार दोस्ती ग्रुप प्रतिष्ठान उरणचे अध्यक्ष तुकाराम गावंड यांनी एकत्र येत उरण विभागातील निसर्ग संस्था वशेणी , सारडे विकास मंच व कोमणादेवी ऑक्सिजन पार्क, जय जनार्दन क्रिएशन संस्था कासारभट, साईकृपा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कोप्रोली , न्हावाशेवा सीएच आधार सामाजिक संस्था ,
सुयश क्लासेस, आवरे विकास मंच , मर्दनगड संवर्धन समिती, आम्ही पिरकोनकर समूह , नरेंद्रचार्य महाराज पाले पिरकोन मठ सेवा केंद्र, पूर्व विभागीय सर्व गोविंद पथके , पूर्व विभागीय सर्व क्रिकेट टीम, सर्व गाव ग्रामपंचायत सरपंच व सदस्य ,
सर्व शाळा विद्यालय, क. भा. पा . विद्यालय पिरकोन, 93 / 94 दहावीची बॅच व या विद्यालयाचे सर्व आजी माजी विद्यार्थी, सद्गुरु श्री अनिरुद्ध उपासना केंद्र आवरे या सामाजिक क्षेत्रातील छोट्या मोठ्या सर्व संस्थांनी एकत्र येत आवरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. गोवठने विकास मंचाचे अध्यक्ष व निवेदक सुनील वर्तक यांनी आपल्या शब्दसुमनांनी या शिबिराची आगळी वेगळी ओळख उपस्थितांना करून दिली.
तेरणा ब्लड बँकेचे डॉ. राजेश बटूला डॉक्टर भाविका रणपिसे श्री केसरीनाथ भगत श्री नितीन पाटील श्री दत्ता राठोड उपेंद्र ठाकूर यांनी जमा झालेले रक्त तेरणा रक्तपेढीमध्ये जमा केले.
वरील संस्था तर्फे रक्तदान केलेल्या रक्तदात्यांचा शान श्रीफळ प्रमाणपत्र व एक आकर्षक भेट देऊन उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला व त्यांचा रक्तदानाचा आदर्श इतरांनीही घ्यावा व इतरांना रक्तदानास प्रवृत्त व्हावे यासाठी डॉ. अशोक म्हात्रे यांनी मार्गदर्शन केले.
Comments
Post a Comment