आवाज कोकणचा / नवी मुंबई 

पनवेल/ प्रतिनिधि 

महिला उत्कर्ष समिती महाराष्ट्रने पोलीस बांधव, एसटी कर्मचारी व दीव्यांग बंधूंना राखी बांधून रक्षाबंधन सणाचे पावित्र्य जपले .

पत्रकार उत्कर्ष समिती या राज्यस्तरीय पत्रकार संघटनेचे सह अंग असलेली महिला उत्कर्ष समितीच्या राज्यभरातील महिला सदस्य व पदाधिकाऱ्यांनी बहिण भावाच्या पवित्र नात्याचा सण रक्षाबंधन या दिनाचे औचित्य साधत आपल्या घरादारापासून , कुटुंबापासून दूर राहून जनसेवा करणाऱ्या एसटी ड्रायव्हर कंडक्टर तसेच "सद्रक्षणाय खलनिग्रहणाय" हे ब्रीदवाक्य आपल्या खांद्यावर घेऊन अहोरात्र समाजात शांतता नांदावी, दुर्जनांचा काळ ठरावी अशा पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना राखी बांधून बहिणीचे कर्तव्य पार पाडले. 


गुहागर येथे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष दीप्ती साळवी , गुहागर तालुका अध्यक्ष सुवर्णा पागडे, उपाध्यक्षा विनाकाष्टे , अनुपमा पोरे यांच्यासह इतर सदस्यांनी गुहागर एसटी आगारातील उपस्थित चालक व कंडक्टर यांना तसेच गुहागर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना राख्या बांधून हा सण उत्साहात साजरा केला. 



नवी मुंबई तुर्भे वाशी विभाग अध्यक्ष वंदना अंबवले, उपाध्यक्ष राणी दळवी, सचिव रेखा पंडित, महाराष्ट्र उपाध्यक्ष आरती पाटील, वैभववाडी सदस्य छाया कदम यांनी आपापल्या विभागातील पोलीस बांधवांना राखी बांधली. 


 देवगड अध्यक्ष संगीता पाटील यांनी वेगळ्या पद्धतीने हा सण साजरा करत दिव्यांग बंधूंना राखी बांधून रक्षाबंधन सणाचा आनंद उपस्थित बंधूंसोबत द्विगुणित केला. 

महिला उत्कर्ष समिती समाजातील विविध समस्यांवर नेहमीच ठोस काम करत असते तसेच आपले संस्कृती आपल्या परंपरा टिकून राहाव्यात यासाठी समितीच्या सर्वच सदस्य व पदाधिकारी आक्रमकपणे कार्य करत असतात.



Comments

Popular posts from this blog