आवाज कोकणचा / ठाणे 

बदलापूर/ प्रतिनिधि 



बदलापूरच्या रणरागिनी समाजसेविका प्रेरणा कुळकर्णी संतश्रेष्ठ श्री शिरोमणी नामदेव महाराज पुरस्काराने सन्मानित...

प्रेरणा फाउंडेशन संस्थापिका/अध्यक्षा सौ. दिप्ती उर्फ़ प्रेरणा वैभव  कुलकर्णी यांचा जनराष्ट्रीय रेल्वे शु शाईन कामगार युनियन तर्फे राष्ट्रसंत श्री शिरोमणी रोहिदास महाराज व उत्कृष्ट नाट्यलेखन व दिग्दर्शक 2024 पुरस्कार देऊन सन्मान


              जनराष्ट्रीय रेल्वे शु शाईन कामगार युनियन तर्फे दिनांक 30/08/2024 शुक्रवार रोजी, कस्तुरबा हॉल , सेनापती बापट रोड ,पश्चिम माटुंगा येथे उत्साहात साजरा केला गेला.या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर अध्यक्ष धडक कामगार युनियन श्री.अभिजित दादा राणे,अध्यक्ष जनरल जंगल एम्पॉइज असोशिएशन श्री. नंदकिशोर खानविलकर , राष्ट्रीय अध्यक्ष जनराष्ट्रीय रेल्वे शु शाईन कामगार युनियन व आयोजक श्री.दिपक काळींगण व राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय महिला कामगार मंच सौ अनिला शुक्ला व दिग्दर्शक दत्ता जवळगे उपस्थित होते.


 या कार्यक्रमात  प्रेरणा फाऊंडेशन संस्थापिका अध्यक्षा सौ. दिप्ती उर्फ प्रेरणा वैभव कुलकर्णी यांना राष्ट्रसंत श्री शिरोमणी रोहिदास महाराज व उत्कृष्ट नाट्यलेखन व दिग्दर्शक 2024 पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी त्यांनी प्रेरणा फाऊंडेशनच्या कार्याची थोडक्यात माहिती दिली व आयोजक श्री.दीपक काळींगण व सर्व मान्यवरांचे आभार मानले. स्वादिष्ट भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.



Comments

Popular posts from this blog