आवाज कोकणचा / नवी मुंबई
उलवे / प्रतिनिधि
स्वराज्य मित्र मंडळ शेलघर तर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप पत्रकार उत्कर्ष समिती अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती
नवी मुंबई उलवे नोड
गव्हाण ग्रामपंचायत हद्दीतील शेलघर गावचे सामाजिक कार्यकर्ते व स्वराज्य मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक श्री अविनाश मोतीराम भगत यांनी आपले सहकारी व मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रशांत भगत व आपल्या सहकाऱ्यांसह जिल्हा परिषद शाळा शेलघर व जिल्हा परिषद शाळा जावळे या ठिकाणी इयत्ता पहिली ते चौथी च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले या कार्यक्रमासाठी पत्रकार उत्कर्ष समितीचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
शेलघरचे जेष्ठ नागरिक श्री. अमृतशेठ भगत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
ज्ञानाची देवता देवी सरस्वती मातेला पुष्पहार अर्पण करून व शेलघर चे सुपुत्र दिवंगत जनार्दन आत्माराम भगत यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना स्वराज मित्र मंडळातर्फे शैक्षणिक साहित्य ज्यामध्ये अर्धा डझन वह्या, कंपास पेटी पेन्सिल शार्पनर पेन या वस्तूंचा समावेश होता.
यावेळी बोलताना पत्रकार उत्कर्ष समिती अध्यक्ष यांनी स्वराज्य मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष यांचे त्यांच्या कार्याबद्दल कौतुक केले.
सामाजिक बांधिलकी जपत समाजाच्या शेवटच्या स्तरावर असलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचले पाहिजे अशी त्यांची विचारधारा आहे. विद्यार्थी शिकला तरच समाज घडू शकतो हे त्यांचे म्हणणे वास्तवात येण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून अविनाश भगत हे विभागातील शाळांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून शाळा व्यवस्थापन, विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये एक धागा बनून कार्यरत असतात.
आधुनिक काळातील बदललेले शिक्षणाचे स्वरूप व इंग्रजी शाळेकडे पालकांचा असलेला कल याबाबत डॉ. म्हात्रे यांनी सविस्तर माहिती देत जास्तीत जास्त स्थानिक जनतेने विद्यार्थी मराठी शाळेत जाईल यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत असे म्हटले.
मातृभाषेतून शिक्षण घेतल्यास ते समजण्यास सोपे व विद्यार्थ्यांच्या बौद्धिक पातळीनुसार त्याचा मानसिक विकास घडण्यास सहाय्यभूत ठरते.
या कार्यक्रमासाठी वंदना भगत जोक्स ना भगत सुनंदा भगत सारिका भगत सविता भगत सुनिता भगत या महिला कार्यकर्त्यांसह शेलघर व जावळे गावच्या प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या. समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी कार्य करण्याच्या अविनाश भगत यांच्या या कार्याचे समाजातील विविध स्तरावर कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Comments
Post a Comment