समाजातील पहिली महिला पोलीस म्हणून बनण्याचा मान मिळाला होळकरांच्या कन्येला...

 कोकणातील गोपाळ समाजातील पहिली महिला पोलीस म्हणून बनण्याचा मान मिळाला होळकरांच्या कन्येला...

 

कुमारी संतोषी केशव होळकर हिच्या जिद्दीला सलाम... 

पोलादपूर/राजेंद्र होळकर

            पोलादपूर तालुक्यातील रानबाजीरे गावातील कैलासवासी केशव होळकर यांचे निधन झाल्यानंतर आपली आई लक्ष्मी व भाऊ सुनील होळकर सह उदरनिर्वासाठी पुण्यामध्ये जाऊन पदवीचे शिक्षण पूर्ण  करत पोलीस बनण्याची जिद्द मनी बाळगत भावाच्या साथीने व आईच्या आशीर्वादाने कुमारी संतोषीने 2016 पासून विविध भरती प्रक्रियेमध्ये सहभाग घेत आतापर्यंत मुंबई, रायगड ,जळगाव ,पिंपरी चिंचवड ,पुणे सिटी व आता सातारा जिल्ह्या मध्ये सहभाग घेतला होता. पुणे सिटी मध्ये व पिंपरी चिंचवड मध्ये दोन गुणांनी वेटिंग वर असणारी संतोषी सातारा जिल्ह्य़ात एन टी बी प्रवर्गात टॉपर बनली आहे. तिची ही जिद्द, मेहनत करण्याची तयारी  पाहता तिचे संपूर्ण महाराष्ट्र गोपाळ समाज,कोकण गोपाळ समाज,रायगड जिल्हा गोपाळ समाज ,पुणे जिल्ह्य़ातील विविध मान्यवरांकडून भरभरून कौतुक होत आहे.

                   कोकणातील छोट्याशा गावामध्ये जन्मलेली संतोषी आपल्या जिद्दीने इथपर्यंत पोचली हेच आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे रायगड जिल्ह्यात होळकर कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे .रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नवी मुंबई, पुणे, नगर, वाशिम, यवतमाळ, नागपूर आदि ठिकाणाहून प्रत्यक्ष भ्रमण ध्वनी द्वारे व व्हाट्सअप च्या माध्यमातून तिचे भरभरून कौतुक करत तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहेत. काल प्रत्यक्ष जाऊन नगरसेवक माननीय श्री तानाजी बारणे श्री. संतोषजी निकम. संतोषजी जाधव श्री. रवींद्र माने. दयानंद साबळे. श्री किशोर चव्हाण आदी मान्यवरांनी घरी जाऊन अभिनंदन व कौतुक केले

Comments

Popular posts from this blog