आवाज कोकणचा / नवी मुंबई 

उरण - पुजा चव्हाण

न्हावा शेवा जे.एन.पी. ए. पियूबी रस्ता बनला मृत्यूचा सापळा. 

 अपघातात एकाचा मृत्यू, दोघे जखमी...

करळ फाटा ते  जे एन पी ए हा मार्ग वाहने व सामान्य जनता यांचा प्रवास सुरक्षित व्हावा  यासाठी येथे अनेक उड्डाण पूलांचे जाळे उभारण्यात आले आहे . 

परंतू अतिजड वाहने,  चालकांचा बेशिस्तपणा , वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन यामुळे या विभागात  अपघातांचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढतच चालले आहे व परिणामी सर्वसामान्य जनता आपला प्राण गमावत आहे.  

दास्तान ते दिघोडे - चिरनेर मार्ग , खोपटा ते उरण रस्ता या ठिकाणी अपघात सत्र सातत्याने चालूच आहे. 


     आज दिनांक ७ ऑगस्ट रोजी जे एन पी ए रोडवरील पी यु बी न्हावा शेवा कस्टम ऑफिस नजिकच्या रोडवर सकाळी सात वाजण्याच्या च्या सुमारास रिक्षा व ट्रेलर चा भिषण अपघात झाला. 

    अपघाताचे सविस्तर वृत्त असे की रात्रपाळी करून भरत ठाकूर राहणार केळवणे, चिरनेर भोम येथील सचीन म्हात्रे आणि आकाश चौगुले हे तिघे रिक्षातून घरी येत असताना पी यु बी येथे आले असता समोरून येणाऱ्या भरधाव ट्रेलर ने रिक्षास जोरदार धडक दिली.  या भीषण अपघातात भरत ठाकूर यांचा जागीच मृत्यू तर सचीन म्हात्रे, आकाश चौगुले हे गंभीर जखमी झाले आहे. 

प्रत्यक्षदर्शी पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष अनिकेत वसंत तांडेल हे ड्युटीवर जात असताना त्यांनी या घटनेची माहिती न्हावा शेवा पोलिस स्टेशनचे पी .एस .आय.  दिपक दाभाडे यांना दिली.  डीपी वर्ल्ड कंपनीच्या रुग्णवाहिकेने अपघातग्रस्त तिनही व्यक्तींना जे एन पीए हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असता भरत ठाकूर हे मृत झाल्याचे सांगण्यात आले. सचीन म्हात्रे व आकाश चौगुले यांना पुढील उपचारासाठी वाशी येथील एम जी एम रुग्णालयात हलविण्यात आले आहे असे समजते. 

Comments

Popular posts from this blog