आवाज कोकणचा / नवी मुंबई
प्रतिनिधि / उरण
पत्रकार उत्कर्ष समितीने वाहतूक पोलिसांना केले सन्मानित....
जागतिक दर्जाचे स्थान असलेला व महाराष्ट्राची शान ठरलेल्या अटल सेतू या पुलाची रेलिंग पार करून एक महिला आपली गाडी थांबूवून आत्महत्येचा प्रयत्न करत असल्याची माहिती नवी मुंबई तील न्हावाशेवा वाहतूक पोलीस शाखेला मिळाल्यानंतर गस्तीवर असलेले पोलीस शिपाई मयूर पाटील, पोलीस शिपाई यश सोनवणे, पोलीस नाईक किरण म्हात्रे, पोलीस नाईक ललित शिरसाठ या चार बहादुर पोलिस कर्मचाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेत आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या महिलेला जीवाची पर्वा न करता बाहेर काढले व सदर महिलेचा जीव वाचवला.
वाहतूक पोलिसांच्या या कार्याची दखल पत्रकार उत्कर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे व सहकाऱ्यांनी घेऊन या पोलीस बांधवांना न्हावा शेवा पोलीस ठाणे येथे सन्मानित केले व त्यांच्या कार्याचा गौरव केला.
यावेळी वरिष्ठ वाहतूक पोलीस निरीक्षक श्री. गुलफावर मुजावर, महिला उत्कर्ष समिती नवी मुंबई अध्यक्ष सौ सुजाता दिनेश कडू , सदस्या सौ श्वेता संजय तांडेल, सदस्य सौ प्रीती कडू उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मुजावर यांनी पत्रकार उत्कर्ष समितीच्या या कार्याची स्तुती केली तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा ही दिल्या व वाहतूक नियमांविषयी सामान्यांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी पत्रकार उत्कर्ष समितीने कार्यक्रम राबविण्याचे आवाहन केले.
Comments
Post a Comment