आवाज कोकणचा /नवी मुंबई

उरण - पूजा चव्हाण

विजय विकास सामाजिक संस्थेचे वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रम रद्द...

उरण तालुक्यातील नवघर येथील रायगड जिल्हा परिषद सदस्य श्री विजय भोईर व ब्लू स्टार सिक्युरिटी व फॅसिलिटी सर्विसेस चे प्रोपायटर श्री विकास भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते . परंतु येथील ज्येष्ठ समाजसेवक व भोईर कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती व विजय आणि विकास भोईर यांचे चुलत भाऊ किसन सखाराम भोईर ( सर्वांचे लाडके दादा )यांचे शनिवार दिनांक 14 सप्टेंबर 2024 रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. 



विजय भोईर व विकास भोईर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत सामाजिक बांधिलकी व संस्कृती आणि परंपरा जोपासतानाच युवा पिढीला प्रोत्साहन देणारे कार्यक्रम जसे पारंपारिक फेऱ्याचे डान्स स्पर्धा कराटे स्पर्धा पोहण्याच्या स्पर्धा आदिवासी वाढीवरील मुलांना शाळेपयोगी वस्तू व फलाहरवाटप फळी स्पर्धा मॅरेथॉन स्पर्धा व अभिष्टचिंतन सोहळा 22 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. 



किसन भोईर यांच्या अकाली निधनामुळे आयोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे विजय विकास सामाजिक संस्थेतर्फे जाहीर करण्यात आले असून किसन भोईर यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी यासाठी सर्वांनी ईश्वरचरणी प्रार्थना करण्याची विनंती संस्थेतर्फे करण्यात आली आहे.

Comments

Popular posts from this blog