आवज कोकणचा / नवी मुंबई 

प्रतिनिधी .

नैना प्रकल्प बाधित शेतकऱ्यांची सिडको सोबत चर्चा.... 

आगरी समाज नेते जयेंद्र दादा खुणे यांच्यासह शेतकरी उत्कर्ष समिती होणार चर्चेमध्ये सहभागी

पनवेल तालुक्यातील नैना प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्या अस्तित्वासाठी व त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांना वाचा फोडून निवारण करण्यासाठी


पनवेल तालुक्यातील सर्व नैना प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन आगरी समाजाचे नेते श्री जयेंद्र दादा खुणे यांच्यासह शेतकरी उत्कर्ष समितीने केले आहे. 



गुरुवार दिनांक २६ सप्टेंबर २०२४ रोजी सिडको महामंडळाचे नवनिर्वाचित  अध्यक्ष श्री संजय शिरसाट   यांच्या समवेत आगरी समाज नेते   श्री जयेंद्र दादा खुणे  व नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समिती यांच्या नेतृत्वाखाली बैठक आयोजित केलेली आहे. 

  या बैठकीसाठी प्रकल्प बाधित प्रत्येक गावातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी व महिलांनी  सकाळी ११ वाजता  अध्यक्ष  सिडको कार्यालय कोकण भवन येथे उपस्थित रहावे असे आवाहन नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समिती अध्यक्ष व कार्यकारणी समिती सदस्य यांनी केले आहे.



Comments

Popular posts from this blog