आवाज कोकणचा / नवी मुंबई
पनवेल/ प्रतिनिधी
अपना दल’ पक्षाचे संस्थापक डॉ. सोनेलाल पटेल यांच्या पुण्यतिथी निमित्त आदरांजली ; केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांची प्रमुख उपस्थिती
उत्तर प्रदेश राज्यात सक्रिय राजकारणी राहिलेले तसेच अपना दल या राजकीय पक्षाचे संस्थापक शेतकरी पीडित शोषित वंचित यांचे कैवारी डॉ. सोनेलाल पटेल यांचा पुण्यतिथी कार्यक्रम गुरवारी पनवेलमधील विरुपाक्ष मंगल कार्यालयात झाला. या कार्यक्रमाला आरोग्य व कुटूंब कल्याण केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती अनुप्रिया पटेल उपस्थित राहून त्यांनी डॉ. सोनेलाल पटेल यांना अभिवादन केले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, कार्यक्रमाचे संयोजक व पॅनेसिया हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. सुभाष सिंह, पत्नी संतोष सिंग , शरद गुप्ता, हेमंत इंदप, संजय तांडेल, भारत टोपले, योगेश तांडेल, गुरुनाथ राणे यांच्यासह पेनिसिया हॉस्पिटल चा कर्मचारी वर्ग सहसंयोजक डॉ. अशोक सिंह, ब्रिजेश पटेल, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment