आवाज कोकणचा / नवी मुंबई 

उरण पोलीस व केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलातर्फे उरण विभगामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संचालन



पूजा चव्हाण/ उरण

सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ.विशाल नेहूल व उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली



 औद्योगिक सुरक्षा बलाचे ( सीआयएसएफ ) १ पोलिस निरीक्षक , २ पोलिस  उपनिरीक्षक यांच्यासह ५० जवान तसेच उरण पोलिस ठाणे यांचे १ पोलिस निरीक्षक,५ सहाय्यक पोलिस निरीक्षक उपनिरीक्षक,२० अंमलदार यांनी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृतीसाठी संचालन केले. 


 उरण १९० - विधानसभा मतदार संघातील संवेदनशील असलेल्या मतदान केंद्रे, व संवेदनशील परिसरात काल २५ ऑक्टोबर रोजी जासई गाव ते रांजनपाडा रिक्षा स्टॅन्ड,,


नव्याने उदयास येत असलेल्या द्रोणागिरी नोड वसाहत, नवीनशेवा, उरण एसटी स्टॅन्ड, चारफाटा ते राजपाल नाका, जरी मरी मंदिर, उरण बाजारपेठ, मस्जिद मोहल्ला, वाणी आळी, स्वामी विवेकानंद चौक, बोरी व उरण न्यायालय रोड येथे संचालन करण्यात आले. 



Comments

Popular posts from this blog