रणांगण दिवाळी अंक ....
राजकारणाचं सुरू असलेलं अधःपतन, भोवताली वाढत असलेला चंगळवाद, समाजातून हरपत चाललेला संवाद आणि संवेदनशीलता, अशा अस्वस्थ वर्तमानावर विचारमंथन करणारा रणांगण दिवाळी अंक
'कारण-राजकारण' हा विषय घेऊन आकाराला आला आहे. प्रकाश अकोलकर, उल्का महाजन, प्रसन्न जोशी, दिनेश गुणे, संजय परब, अशा अनेक जाणकारांनी राजकारणाच्या आणि समाजाच्या ढासळलेल्या स्थितीवर कटाक्ष टाकणारं लेखन केलं आहे. त्यामधून आरक्षण, भटक्या विमुक्यांचे प्रश्न, माध्यमांमधला जातीवाद असे अनेक विषय प्रतलावर आणले गेले आहेत.दीपा पवार,वैभव छाया, अमोल कुलकर्णी, महेंद्र नाईक डॉ. अमोल अन्नदाते आणि कौस्तुभ जोशी यांचे विविध विषयावरील लेख आहेत.
रुचकर कविता आणि खमंग कथांच्या विभागासोबत 'रणांगण'ने विविध डॉक्टरांच्या आरोग्यविषयक चर्चेचा विभाग सादर केलाय. वेधक मांडणी आणि खुसखुशीत रेखाचित्रांनी नटलेला, राजकारण आणि समाजकारणातील मर्म मांडू पाहणारा दिवाळी अंक - रणांगण
संपादक - डॉ. अविनाश गारगोटे
अतिथी संपादक - प्रशांत ननावरे
कार्यकारी संपादक - डॉ. श्रीधर नाईक
रणांगण दिवाळी अंक 2024
पृष्ठसंख्या - 200
मूल्य - 300 रुपये
Comments
Post a Comment