
जनेप प्राधिकरणाने प्रमुख बंदरांच्या सचिवांच्या परिषदेसाठी आलेल्या प्रमुख पत्तनांचे प्रतिनिधी आणि पत्तन, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे यजमानपद भूषविले आवाज कोकणचा / उरण दि 30 भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जवाहरलाल नेहरू पत्तन प्राधिकरणाने (जनेप प्राधिकरण) शुक्रवारी, 29 नोव्हेंबर 2024 रोजी प्रमुख बंदरांच्या सचिवांच्या परिषदेचे आयोजन केले होते. या दोन दिवसीय परिषदेत प्रमुख बंदरांचे प्रतिनिधी आणि पत्तन, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. या परिषदेचे उद्घाटन जनेप प्राधिकरणाचे अध्यक्ष, श्री उन्मेष शरद वाघ भा.रा.से., यांनी श्री संदीप गुप्ता, संयुक्त सचिव, पत्तन, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालय, श्री पी. के. रॉय, संचालक (पीएचआरडी) आणि श्रीमती. मनीषा जाधव, महाव्यवस्थापक (प्रशासन) आणि सचिव, जनेप प्राधिकरण या मान्यवरांच्या उपस्थितीत केले. आपल्या उद्घाटनपर भाषणात, जनेप प्राधिकरणाचे अध्यक्ष, श्री उन्मेष शरद वाघ भा.रा.से., यांनी बंदर क्षेत्रातील सहकार्य आणि नवोन्मेषासाठी जनेप प्राधिकरणाचे समर्पण अधोरेखित केले. ते म्हणाले, "ज्ञान सामायिक...