आवाज कोकणचा /  नवी नवी मुंबई 

उलवे / अशोक म्हात्रे 

उरण विधानसभेचे उमेदवार प्रितम दादा म्हात्रे यांचा पत्रकारांसाठी दिवाळी स्नेह मेळावा 


आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींची माहिती समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्यासाठी 24 तास कार्यरत असणाऱ्या पत्रकारांचे प्रितम दादा म्हात्रे यांनी कौतुक केले. 



पत्रकारांच्या या कार्याची पोचपावती त्यांना मिळावी व समाजातील त्यांचे मानाचे स्थान कायम राहण्यासाठी जे.एम. म्हात्रे कुटुंबियांच्या वतीने दिवाळी सणाचे औचित्य साधत या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. उरण विधानसभा मतदार संघातील आघाडीचे उमेदवार प्रितम दादा म्हात्रे यांनी मतदार संघातील पत्रकारांसाठी दिवाळी स्नेह मिलन मेळावा आयोजित केला होता.


उरण, पनवेल, खालापूर अशी लांबलचक व्याप्ती असलेल्या या मतदार संघावर भाजपची सत्ता असून महेश बालदी हे यावेळी ही रिंगणात असले तरी प्रितम दादा यांना मात्र आपल्या विजयाची खात्री आहे. 



मतदार संघामध्ये आदिवासी मतदार मोठ्या प्रमाणत असून बहुसंख्य ग्रामीण भाग आहे. उरण पनवेल  तालुक्यात एम. आय. डी.सी. , ओ एन.जी.सी. , जे.एन.पी. टी. , एम. एस ई .बी. या सारखे मोठे प्रकल्प असून लवकरच सुरू होणारे आंतरराष्ट्रीय विमानतळ यासारखे मोठे प्रकल्प असताना व  उच्च शिक्षण घेऊन सुद्धा तरुण बेकार आहे. 

रायगड जिल्हा हा शेकापचा गड असून येथील सुशिक्षित बेकार युवक मोठ्या संख्येने प्रितम दादा यांच्या पाठीशी उभा राहत असल्याचे दिसत आहे. 

ग्रामीण भागात वीज, रस्ते, पाणी व नोकरी या समस्या असून त्यावर सकारात्मक काम करणार असल्याचे प्रितम दादा म्हात्रे यांनी उत्कर्ष न्यूज सोबत बोलताना सांगितले.

आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींची माहिती समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्यासाठी 24 तास कार्यरत असणाऱ्या पत्रकारांचे प्रितम दादा म्हात्रे यांनी कौतुक केले. 

पत्रकारांच्या या कार्याची पोचपावती त्यांना मिळावी व समाजातील त्यांचे मानाचे स्थान कायम राहण्यासाठी जे.एम. म्हात्रे कुटुंबियांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 




 

Comments

Popular posts from this blog