आवाज कोकणचा / नवी मुंबई 

उलवे - ज्ञानेश्र्वर कोळी


शास्त्रीय गायिका धनश्री कोळी यांच्या सुरेल सुरात रंग नवे ध्यास नवे दिवाळी संध्या सादर ...



जगभरात दिवाळी सण उत्साहात संपन्न होत आहे या सणाच्या निमित्ताने उरण तालुक्यातील नवघरचे सुपुत्र पंडित गणेश बंडा यांची सुकन्या व देवी सरस्वती जिच्या जिभेवर विराजमान आहे अशी गव्हाण गावची स्नुषा शास्त्रीय गायिका धनश्री कोळी यांनी स्वररंग परिवार या बॅनर खाली गव्हाण येथील नवोदित गायक व गायिका यांना एकत्र आणून गायन क्षेत्रात भरारी घेण्याच्या दृष्टीने श्रीराम मंदिर गव्हाण येथे रंग नवे, ध्यास नवे या पंक्ती एकत्र घेऊन लोक मनोरंजनाचा कार्यक्रम दिवाळी संध्या आयोजित केला होता. 



तबलावादक ज्ञानदीप बंडा , कीबोर्ड चालक रसिक ठाकूर , ऑक्टोपॅड वादक अभिषेक कडू , व ढोलकी वादक सागर घरत यांच्या संगीताने व धनश्री कोळी यांच्या मधुर , सुरेल , सुश्राव्य आवाजाने उपस्थितांची मने जिंकली.



या कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रित पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अशोक ल .म्हात्रे यांच्यासह श्री राम मंदिर देऊळ कमिटी अध्यक्ष महादेव कोळी उपाध्यक्ष किशोर कोळी माजी पंचायत समिती सदस्य हरिभाऊ पाटील पत्रकार उत्कर्ष समिती प्रदेश सदस्य ज्ञानेश्वर कोळी पखवाज वादक गौरव म्हात्रे यांच्यासह विभागातील जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती.



आपल्या पहाडी आवाजाने नयन कोळी यांनी तर शास्त्रीय गायिका धनश्री कोळी , निशिधा कोळी प्रगती कोळी बाल गायक प्रथम कोळी यांनी त्यांच्या आवाजातील जादूने उपस्थितांना ठेका धरायला लावला. 

स्वररंग परिवाराच्या गायनक्षेत्रातील या कलेचे विभागातील सर्वच स्तरातून कौतुक होत असून पत्रकार उत्कर्ष समिती अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांनी धनश्री कोळी व त्यांच्या गायांक्षेत्रातील सहकाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. 



Comments

Popular posts from this blog