निल हॉस्पिटल सभागृहामध्ये महामुंबई २४×७ न्यूज चॅनेल चा द्वितीय वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न
बुधवार दिनांक ३० ऑक्टोबर रोजी नील हॉस्पिटल मेडीटेशन हॉल नवीन पनवेल येथे महामुंबई चॅनेल चा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात, आनंदात आणि जल्लोषात संपन्न झाला.
दोन वर्षात चॅनलचे पत्रकार आणि महामुंबई चॅनेल चे संपादक मिलिंद खारपाटील यांनी मेहनत घेतल्याने चॅनेल चे सध्या २० लाख viewers पूर्ण झाल्याची गोष्ट नक्कीच अभिनंदनीय उपस्थितांनीअसल्याचे सांगितले.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्ष डॉ अशोक म्हात्रे हे होते.रायगड भूषण प्रा. एल .बी.पाटील, ब्रह्माकुमारी डॉ शुभदा नील , डॉ प्रिन्सिपॉल . अस्लम शेख,सिने अभिनेता योगेश अवसरे, मिस इंडिया डॉ स्वरांजली गायकवाड, कराटे प्रशिक्षक शैलेश ठाकूर,इम्तियाझ गोरखपुरी, युसुफ दिवाण,महामुंबई चॅनेल चे संपादक मिलिंद खारपाटील,श्री अण्णासाहेब हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासाचे रायगड जिल्हा कोषाध्यक्ष श्री विद्याधर ठाकूर,महामुंबई चॅनेल च्या डायरेक्टर डॉ .मुन्नावर सुलताना,नदीम सय्यद, सय्यद शहीद,चिरनेर चे माजी सरपंच पद्माकर फोफेरकर,सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश मोकल आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलाने झाली . यानंतर राष्ट्रगीत झाले.वंदे मातरम्,छत्रपती शिवाजी महाराज की जय आदी घोषणांनी सभागृह दणाणून गेले होते. सिमरन मोकल.ठाकूर हिने गणेशवंदना आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे झक्कास गाणी बोलले.
यानंतर कवी,लेखक,रायगड भूषण प्रा एल बी पाटील यांच्या १९८४ चं उरण शेतकरी आंदोलन या पुस्तकाचे प्रकाशन झाले.अध्यक्षीय भाषणात डॉ अशोक म्हात्रे यांनी संपादक ,तथा उत्कर्ष समिती रायगड चे उपाध्यक्ष श्री मिलिंद खारपाटील यांच्या पत्रकारितेचे कौतुक केले. एल बी पाटील सर यांनी रायगड ,नवी मुंबई सह संपूर्ण राज्यातील ताज्या घडामोडी साठी बातम्या पाहिले जाणारे आवडीचे चॅनेल म्हणून महामुंबई चॅनेल चा उल्लेख केला .याचबरोबर इवान ही आगरी कविता सादर करून सर्वांना हसवून सोडले. डॉ प्रिन्सिपॉल अस्लम शेख यांनी पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून महामुंबई चॅनेल ची वाट सकारात्मक दिशेने होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.उपस्थित सर्व मान्यवरांनी महामुंबई चॅनेल चे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.डॉ शुभदा नील यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.डॉ स्वरांजली गायकवाड यांनी हनुमान चालीसा वर टॅपिंग थेरेपी घेतली.
सदर कार्यक्रमात महामुंबई चॅनेल साठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संपादक मिलिंद खारपाटील, पत्रकार तृप्ती भोईर,प्रकाश कदम, धनराज गोपाळ,सचिन घबाडी,राजेश सोंडकर ,मंगल खारपाटील यांना महामुंबई गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी दिलीप निकम, रणीता ठाकूर,नितेश शेलार, शारदा खारपाटील , राकेश सकपाळ,निलेश म्हात्रे, इत्यादी महामुंबई चॅनेल चे पत्रकार उपस्थित होते.
प्रास्ताविक मुन्नावर सुलताना यांनी केले.पत्रकारांचे मनोगत संजय होळकर सर यांनी केले.संपादकीय मनोगत श्री मिलिंद खारपाटील यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला पत्रकार आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुरेख सूत्र संचालन या चॅनेल च्या निवेदिका तृप्ती भोईर यांनी केले.आभारप्रदर्शन राकेश सकपाळ यांनी केले.
Comments
Post a Comment